नांदेड (प्रतिनिधी) – नांदेडमध्ये कायद्याचे राज्य चालते की गुटखा माफियांचे, असा प्रश्न पडणारा एक भन्नाट आणि तितकाच डोके चक्रावून टाकणारा प्रकार जुन्या नांदेडातील फत्ते बुरूज परिसरात समोर आला आहे. २० सप्टेंबरच्या रात्री एका घरात छापा मारून डीआयजी पथकाच्या पोलिसांनी तब्बल ४३ लाख ३३ हजार ८७४ रुपयांचा गुटखा जप्त केला खरा, पण या कारवाईनंतर जी माहिती समोर आली आहे, तिने पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ यांची उरलीसुरली अब्रूही चव्हाट्यावर आणली आहे. पोलीस ठाण्याचे खरे आका अकबर चाऊस! इतवारा पोलीस ठाण्यातून ज्यांची नुकतीच उचलबांगडी झाली, ते पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ आणि या प्रकरणातील मुख्य आरोपी अकबर चाऊस नासेर चाऊस यांची जवळीक किती घट्ट होती, याचे सुरस किस्से आता शहरात रंगत आहेत. इतवारा पोलीस ठाण्यात कोणत्या पोलीस अधिकाऱ्याला किंवा कर्मचाऱ्याला काय अन् कोणती ड्युटी द्यायची, हे साक्षात खाकी वर्दीतील साहेब नाही, तर हा गुटखा माफिया अकबर चाऊस ठरवत होता म्हणे ! कायदा आणि सुव्यवस्थेचे हे खाजगीकरण ऐकूनच सर्वसामान्यांचे डोळे पांढरे व्हायची वेळ आली आहे. इतकेच नाही, तर पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ यांच्या उचलबांगडीच्या मागचा हातही या अकबर चाऊसाच्या कारभाराचाच आहे, हे आता उघड झाले आहे. विशेष सेवेनंतर दोघांना अटक ज्या घरात गुटख्याचा डोंगर सापडला त्या घराचा मालक शेख समीर शेख सलीम (वय २२) रा फत्तेबुरुज आणि गुटखा माफिया अकबर चाऊस नासेर चाऊस (४१) रा. मंढाई या दोघांना पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ यांनी स्वतः पकडले. दोन तासात आरोपी पकडले पाहिजे असा गुप्त कानमंत्र खनाळ साहेबाना देण्यात आला होता अशी चर्चा होत आहे. त्यांना पकडताना खनाळ साहेबांनी त्यांची भरपूर सेवा केली, असेही काही प्रत्यक्षदर्शी अतिशय मार्मिकपणे सांगतात.विशेष म्हणजे रामेश्वर खनाळ यांची उचल बांगडी झाल्यानंतर त्याना अकबर चाऊसला पकडण्याची जबाबदारी पार पाडावी लागली आहे. दोन दिवसांची खास पोलीस कोठडी प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर कैलासे, पोलीस अंमलदार बालाजी लामतुरे आणि साहेबराव जगताप यांनी दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले. तपासाची प्रगती करण्यासाठी पोलीस कोठडी आवश्यक असल्याचा युक्तिवाद सिद्धेश्वर कैलासे यांनी मांडल्यानंतर, प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी दोन्ही आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. खाकी वर्दीची ड्युटी जर गुटखा माफिया ठरवत असतील, तर दोन दिवसांच्या या पोलीस कोठडीत तपास अधिकारी नेमका कोणाचा आणि काय तपास करतात, याकडे आता संपूर्ण नांदेडकरांचे डोळे लागले आहेत! Kanthak Suryatal Post Views: 193 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation पोलीस डॉ. अधीक्षक नीलाभ रोहन यांनी गल्लीतील दर्शनापासून ताफ्यापर्यंत… क्यूआरटी पथकाचा व्हीआयपी वापर रोखला! शिवरोडवर तिरट जुगार अड्ड्यावर भाग्यनगर पोलिसांचा छापा