माहूर (प्रतिनिधी) – बनावट कागदपत्रे तयार करून त्यावर बनावट स्वाक्षरी व कार्यालयाचा शिक्का मारत दुय्यम निबंधक कार्यालय, माहूर तसेच शेतमालकाची फसवणूक केल्याप्रकरणी चार जणांविरुद्ध माहूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद चंद्रभान राठोड, हर्ष शरद राठोड, अरुणा शरद राठोड आणि रचित शरद राठोड यांनी संगनमत करून शेत सर्व्हे क्रमांक २७९, नमुना क्रमांक ८ गावठाण प्रमाणपत्र, मालकी नोंद प्रमाणपत्र आदी दस्तऐवज बनावट पद्धतीने तयार केले. या कागदपत्रांवर फिर्यादीची बनावट स्वाक्षरी तसेच कार्यालयाचा बनावट शिक्का मारून त्यांचा वापर केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी ग्रामपंचायत अधिकारी विजय मंगू राठोड (वय ५३, रा. सारखणी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून माहूर पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक २०३/२०२६ दाखल करण्यात आला आहे. आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम ३१८(२), ३३८, ३४०(२), ३४२(२), ३४१(२), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव करीत असून, या बनावट कागदपत्रांच्या माध्यमातून आणखी कोणाची फसवणूक झाली आहे का, याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!