माहूर (प्रतिनिधी) – ग्रामसभेत विविध कामांबाबत प्रश्न विचारल्याचा राग मनात धरून भावास शिवीगाळ करून लोखंडी रॉडने डोक्यात मारहाण केल्याची घटना माहूर तालुक्यातील शेकापूर येथे घडली. या प्रकरणी माहूर पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास शेकापूर ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसभा सुरू होती. यावेळी फिर्यादीचे भाऊ समाधान कांबळे यांनी ग्रामसभेत विविध कामांबाबत प्रश्न विचारले. याचा राग मनात धरून आरोपींनी संगनमत करून त्यांना शिवीगाळ केली. तसेच जिवे मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारहाण करून गंभीर जखमी केले व जिवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या प्रकरणी माहेश अशोकराव कांबळे (वय २६, रा. शेकापूर) यांच्या फिर्यादीवरून सुनिल नामदेवराव बेहेर (५५), रामेश्वर रेणुकादास चव्हाण (४५), गणेश नामदेव राठोड (५०), विवेक गणेश राठोड (२२) तसेच अन्य आरोपीविरुद्ध माहूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा गुन्हा रजि. क्र. १६०/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेतील कलम १०९(१), ११५(२), ३५२, ३५१(१), ३(५) तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार संबंधित कलमांखाली दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी किरण भोंडे करीत असून, प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.
