नांदेड – आज दि. २४ ऑगस्ट रोजी प्रा. आ. केंद्र बारुळ येथे स्थलांतरित रुग्ण परत मुळ गांव बारुळ येथे परत येवून प्रा.आ.केंद्र बारुळ येथे हिवताप दुषीत आढळला त्या बाबत जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. अमृत चव्हाण सर यांनी भेट देवुन रुग्णाच्या उपचाराबाबत विचारपूस केली व किटकजन्य आजार प्रतिबंधात्मक मार्गदर्शन केले.
या वेळी वैद्यकिय अधिकारी डॉ. एच. के. साखरे पाटील, डॉ.योगेश दुलेवाड, जिल्हास्तरीय आरोग्य पर्यवेक्षक संजय भोसले, आरोग्य पर्यवेक्षक (हिवताप) कंधार बालाजी कल्हाळे, आरोग्य निरिक्षक माधवराव कोल्हे, जिल्हा किटक समहारक शंकर मलदोडे, कैलास वरपडे, आरोग्य सहाय्यक बाबाराव येलुरे, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी आप्पाराव पोले, एल. एच.व्हि. छाया तेलंगे, तरीवंदना घडे, पेठकर,आरोग्य कर्मचारी अविनाश भांड उपस्थित होते.
प्राथमिक आरोग्य केंद्र बारुळ येथे डॉ अमृत चव्हाण जिल्हा हिवताप अधिकारी यांची भेट
