नांदेड (प्रतिनिधी) – स्वतःला मीडियाचे शहेनशहा समजणाऱ्या आणि तोंडात गुटखा ठेवून आमचे चॅनल कोणीच काढू शकत नाही अशा वल्गना करणाऱ्या मोगली नावाच्या महाशयांची सध्या चांगलीच फजिती उडाली आहे. इतरांचे चॅनल खाण्याची भाषा करणाऱ्या या मोगलीला, आपल्या बातमीत नेमका व्हिडिओ कोणता लावायचा, याची साधी अक्कलही नसावी, याचेच आश्चर्य आता सर्वत्र व्यक्त होत आहे.
प्रकरण काय आहे? देगलूर येथील एका अंध विद्यालयात एका अल्पसंख्याक मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची अत्यंत गंभीर आणि संवेदनशील घटना घडली होती. या घटनेचे गांभीर्य लक्षात न घेता, मोगलीच्या चॅनलने बातमी तर दिली, पण त्यात व्हिडिओ मात्र चक्क इंदरजितसिंग बावरी खून प्रकरणातील आरोपींची मिरवणूक काढणाऱ्या नांदेड ग्रामीण पोलिसांचे लावले. चॅनलचे प्रतिनिधी म्हणून काम करताना किमान जबाबदारीचे भान असावे लागते, पण येथे तर विद्वत्तेचा पूर्णपणे दुष्काळच दिसत आहे.
वारसा हक्काने मिळालेली धंदेगिरी: स्रोतांनुसार, लोकांना दबावाखाली ठेवण्याचा धंदा या मोगलीला त्याच्या बापाकडून वारसा हक्काने मिळाला आहे. तोंडात तंबाखूचा गोळा (गुटखा)कोंबून आम्हीच सर्वात महत्त्वाचे मीडिया आहोत असा आव आणणाऱ्या या पठ्ठ्याला २४ तास उलटूनही आपल्या चुकीची साधी जाणीव झालेली नाही.
अक्कल की मटेरियल? इतरांचे चॅनल खाण्याची भाषा करणाऱ्यांनी नक्की काय खावे, हे आता जनतेनेच ठरवलेले बरे. कारण ज्यांना बातमी आणि त्यामागचा व्हिडिओ यांचा मेळ घालता येत नाही, ते कसली पत्रकारिता करणार? तोंडात तंबाखूचे मटेरियल (गुटखा) दाबून समाजाला शहाणपण शिकवणाऱ्या या मोगलीचे आणि त्याच्या चॅनलचे आता चहुबाजूंनी पोस्टमार्टम सुरू झाले आहे.
मीडियाच्या नावाखाली केवळ दबावतंत्राचा वापर करणाऱ्या आणि साध्या तांत्रिक बाबींचे ज्ञान नसलेल्या अशा प्रवृत्तींमुळे पत्रकारितेची प्रतिमा किती मलिन होते, हेच या घटनेतून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
मोगलीच्या बातमीची लिंक वाचकांच्या सोयीसाठी ..
