कंधार (प्रतिनिधी) – नांदेड जिल्ह्यात अवैध वाळू उपसा व वाहतुकीला आळा घालण्यासाठी सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत कंधार उपविभागीय पोलीसांनी धडक कारवाई करत दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करून एकूण ₹48 लाख 16 हजार 610 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पहिल्या कारवाईत कंधार-तेल्हारा मार्गावर संशयित हायवा वाहनाचा पाठलाग करण्यात आला. चालकाने वाहन सोडून पळ काढल्याने पंचनामा करून सुमारे ₹40 लाख किमतीचा हायवा जप्त करण्यात आला. या प्रकरणी कंधार पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता व गौण खनिज कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसऱ्या कारवाईत पिंपळधरी फाटा, कापशी (बु.) येथे MH-20-EG-8884 क्रमांकाचा हायवा थांबवून तपासणी केली असता वाहनात बेकायदेशीररित्या वाळूची वाहतूक होत असल्याचे आढळून आले. वाहनातील सुमारे 5 ब्रास वाळू व हायवासह ₹8 लाख 16 हजार 610 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चालकाविरुद्ध उश्माननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी सुशील जुमडे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. Kanthak Suryatal Post Views: 654 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation घरफोडीचा गुन्हा उघड; आरोपी जेरबंद, सुमारे ४८ हजारांचा मुद्देमाल जप्त उद्या पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांचा नांदेड जिल्ह्यातील नागरिकांशी संवाद