अर्धापूर (प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्यात प्रतिबंधित गुटखा, पानमसाला व सुगंधित तंबाखूच्या अवैध वाहतुकीविरोधात अर्धापूर पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल ₹7 लाख 82 हजार 40 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून प्रतिबंधित गुटख्याचा साठा तसेच वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली कार जप्त करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात अवैध व्यवसायांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेदरम्यान अर्धापूर पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार, हिंगोलीहून नांदेडकडे जाणाऱ्या स्विफ्ट डिझायर (MH-29-BC-2692) या कारमधून प्रतिबंधित गुटखा, पानमसाला व सुगंधित तंबाखूची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी चोरंबा फाटा येथे सापळा रचून वाहन अडविले. वाहनाची तपासणी केली असता मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ आढळून आले. या प्रकरणात सकलेन मुश्ताक देशमुख (रा. पेन्शनपुरा, हिंगोली) आणि आरिफ शेख नदीम शेख (रा. मस्तानशहा नगर, हिंगोली) या दोघांना ताब्यात घेण्यात आले. आरोपींकडून सुमारे ₹2.82 लाखांचा प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ तसेच ₹5 लाख किमतीची स्विफ्ट डिझायर कार असा एकूण ₹7.82 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी अर्धापूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, 2006 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक कांबळे पुढील तपास करीत आहेत. अवैध गुटखा पुरवठा साखळीतील इतर संबंधितांचा शोधही सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. ही कारवाई पोलीस निरीक्षक महादेव मांजरमकर, पोलीस उपनिरीक्षक सुरेश भोसले व अर्धापूर पोलीस ठाण्याच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. जिल्ह्यात प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांच्या अवैध साठा, विक्री आणि वाहतुकीविरोधात कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले असून, नागरिकांनी अशा प्रकारची माहिती तात्काळ पोलिसांना देण्याचे आवाहन केले आहे. Kanthak Suryatal Post Views: 804 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation नांदेड ग्रामीण पोलिसांची जुगार अड्ड्यावर कारवाई; सात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल, दुचाकी आणि मोबाईल मिळून ५ लाखांचा मुद्देमाल जप्त लिंबगाव पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड;राहटी वाळू वर कधी येणार कायदेशीर निर्बंध