पहिल्या घटनेत, ४ जुलै रोजी रात्री ८ ते ५ जुलै रोजी पहाटे ४ वाजण्याच्या दरम्यान नायगाव येथील फिर्यादी व साक्षीदार यांच्या दुकानाचे शटर वाकवून अज्ञात चोरट्यांनी आत प्रवेश केला. दुकानातील ९ हजार रुपयांची रोकड चोरून नेली. तसेच शेजारील प्रिन्स मल्टीसर्व्हिस किराणा दुकानाचे शटर वाकवून चोरीचा प्रयत्नही करण्यात आला. याप्रकरणी टेंभुर्णी येथील योगेश दत्ता बंडगे (वय २६) यांच्या फिर्यादीवरून नायगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०५, ३३१(४) व ६२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ/पवार करीत आहेत.
दुसऱ्या घटनेत, ४ जुलै रोजी रात्री ९ ते ५ जुलै रोजी पहाटे २.३० वाजण्याच्या दरम्यान कुंटूर (ता. नायगाव) येथील दुकानाचे शटर वाकवून चोरट्यांनी आत प्रवेश केला. दुकानातील रोख रक्कम, बिस्किटांची पाकिटे, गोल्ड फ्लेक सिगारेट पाकिटे, काजू, बदाम तसेच दोन जुने मोबाईल फोन असा एकूण १८ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी पांडुरंग श्रीराम जाधव (वय ३३, रा. कुंटूर) यांच्या फिर्यादीवरून कुंटूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०५, ३३१(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोहेकॉ/पवार करीत आहेत.
सलग घडलेल्या या दुकानफोड्यांमुळे नायगाव तालुक्यातील व्यापाऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून, चोरट्यांचा लवकरात लवकर शोध घेण्याची मागणी व्यापाऱ्यांकडून करण्यात येत आहे.
