नांदेड (प्रतिनिधी) – जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत नांदेड ग्रामीण पोलिसांनी गोदावरी नदीपात्रातील अवैध वाळूउपसा व साठ्यावर मोठी कारवाई करत सुमारे ₹32 लाख 25 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी दोन अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. दिनांक 5 जुलै रोजी सायंकाळी सुमारे 5.30 वाजण्याच्या सुमारास नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मार्कंडेय येथील गोदावरी नदीपात्रात अवैधरित्या वाळू उपसा करून साठा करण्यात येत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या पथकाने घटनास्थळी धाड टाकली. कारवाईदरम्यान पोलिसांनी अवैध वाळूउपशासाठी वापरली जाणारी दोन इंजिने, नदीपात्रातील 40 तराफे आणि नदीघाटावर साठवून ठेवलेली एकूण 125 ब्रास वाळू जप्त केली. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे ₹32.25 लाख असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 829/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता कलम 303(2) तसेच महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम 48(7) व 48(8) अंतर्गत दोन अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोळकर, पोलीस उपनिरीक्षक व्यंकट कुसमे तसेच पोलीस अंमलदार कानगुले, भिसे, तेलंग, जमीर, टिपरसे, लोखंडे आणि नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीविरोधातील अशा प्रकारच्या कारवाया पुढेही सातत्याने सुरू राहणार असल्याचा इशारा नांदेड ग्रामीण पोलिसांनी दिला आहे. Kanthak Suryatal Post Views: 1,005 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation अर्धापूर पोलीस ठाण्याची सूत्रे पोलीस निरीक्षक महादेव मांजरमकर यांच्याकडे; जबाबदारीच्या जाणीवेतून कार्याला सुरुवात नायगाव तालुक्यात सलग दोन दुकानफोड्या; रोकडसह २७ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास