नांदेडमध्ये घरफोडी; १.३० लाखांचा ऐवज लंपास

नांदेड (प्रतिनिधी) – शहरातील मिल्लतनगर परिसरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून तब्बल १ लाख ३० हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मोहम्मद जुबेरोद्दीन निजामोद्दीन (वय ३५, रा. मिल्लतनगर, नांदेड) हे दिनांक १९ जून २०२६ रोजी रात्री घर बंद करून बाहेर गेले होते. दरम्यान, १९ जून रोजी रात्री ११.४० ते २० जून रोजी सकाळी ७.३० वाजण्याच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप उघडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण १ लाख ३० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. घरातील साहित्य अस्ताव्यस्त झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादींनी पोलिसांत तक्रार दिली. या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ७३७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३०५(अ) व ३३१(४) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ. वाघमारे करीत आहेत. घरफोडीच्या वाढत्या घटनांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!