नांदेड- नुकताच इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. यात गोदावरी प्राथमिक ते उच्च माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी श्रेया कमलाकर भांडे हिने 93.60 टक्के गुण घेऊन घवघवीत यश मिळवले आहे. गोदावरी प्राथमिक ते उच्च माध्यमिक विद्यालयात ती चौथ्या क्रमांकावर आली आहे. तिच्या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
