ऑपरेशन यात्री सुरक्षा अंतर्गत परभणी रेल्वे स्थानकावर चोरीचे प्रयत्न उधळून लावण्यात RPF ला यश 

नांदेड (प्रतिनिधी) – रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि संरक्षणासाठी सुरू असलेल्या ऑपरेशन यात्री सुरक्षा अंतर्गत रेल्वे सुरक्षा बल (RPF), नांदेड विभाग सतत दक्षता आणि प्रतिबंधात्मक कारवाई करत आहे.

दि. 06 मे 2026 रोजी क्राईम इंटेलिजन्स ब्रांच, नांदेड यांच्या पथकाने परभणी रेल्वे स्थानकावर दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये प्रवाशांना लक्ष्य करणाऱ्या दोन संशयित चोरट्यांना ताब्यात घेण्यात यश मिळविले. पहिल्या घटनेत, सकाळी सुमारे 09:30 वाजता, श्री अमोल वावळे, पोलीस उप निरीक्षक /CIB-D&I/नांदेड हे गाडी क्रमांक 17253 गंटूर–छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेसच्या थांब्यादरम्यान परभणी रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 02 जवळ प्रवाशांच्या सामान चोरी करणाऱ्या संशयितांवर नजर ठेवून होते. त्यावेळी पादचारी पुलाजवळ प्रवाशांचे सामान चोरण्याचा प्रयत्न करत असताना परभणी जिल्ह्यातील पूर्णा येथील दीपक नामक संशयितास ताब्यात घेण्यात आले.

तसेच, त्याच दिवशी सुमारे 11:30 वाजता, श्री अमोल वावळे,  पोलीस उप निरीक्षक/CIB/नांदेड यांनी गाडी क्रमांक 17618 हजूर साहिब नांदेड–छत्रपती संभाजीनगर तपोवन एक्सप्रेसच्या थांब्यादरम्यान प्लॅटफॉर्म क्रमांक 03 जवळ देखरेख करत असताना आणखी एका संशयितास ताब्यात घेतले. जालना जिल्ह्यातील परतूर येथील महादेव नामक आरोपी पादचारी पुलाजवळ प्रवाशांचे सामान चोरी करण्याच्या प्रयत्नात असल्याचे आढळून आले.दोन्ही आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी लोहमार्ग पोलीस (GRP), परभणी यांच्या ताब्यात देण्यात आले. GRP/परभणी यांनी अनुक्रमे गुन्हा क्रमांक 95/2026  व 96/2026 महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम 110 व 117 अंतर्गत नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.रेल्वे स्थानके आणि गाड्यांमध्ये प्रवाशांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी सतत देखरेख, गुप्त माहिती संकलन आणि सक्रिय मोहिमांद्वारे RPF नांदेड विभाग कटिबद्ध आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!