नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल नवीन नांदेड (प्रतिनिधी)- तांदूळ होलसेल खरेदीच्या नावाखाली 30 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला असून या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक 24 फेब्रुवारी 2026 ते 28 फेब्रुवारी 2026 दरम्यान ज्ञानेश्वर नगर येथील फिर्यादीच्या ट्रेडिंग कंपनी, सिडको नांदेड येथे हा प्रकार घडला. आरोपी फरीद भैया (रा. लखनौ, उत्तर प्रदेश), रघुनंदन गोंडा (रा. उत्तर प्रदेश) व आलोक खरे (रा. उत्तर प्रदेश) यांनी संगनमत करून फिर्यादीकडून तांदूळ होलसेल खरेदी करण्याच्या बहाण्याने बँक ऑफ बडोदा खात्यावर 20 लाख रुपये पाठवले. त्यानंतर आणखी पैसे पाठवण्याची मागणी करत फिर्यादीकडून पुन्हा 10 लाख रुपये मागवून घेतले. मात्र त्यानंतर आरोपींनी तांदूळ न देता तसेच घेतलेली रक्कम परत न करता फिर्यादीची फसवणूक केली. याप्रकरणी फिर्यादी सोमनाथ दिनकर मिसाळ (वय 30, रा. पांगरा, ता. आटी, जि. बीड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 240/2026 अंतर्गत भारतीय दंड संहिता कलम 316(2), 3(5) तसेच बीएनएस-2023 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोहेकॉ/486 तेलंगे हे करीत आहेत. Kanthak Suryatal Post Views: 832 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation १८ मार्च रोजी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या ७५० व्या जयंती वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाची आध्यात्मिक मानवंदना तृतीयपंथी समाजाला राजकीय प्रतिनिधित्व न दिल्याने डॉ. सान्वी जेठवाणी नाराज