जागतिक महिला दिनी ऑक्सफर्ड महिला पालक मेळावा उत्साहात संपन्न नांदेड – स्त्रियांच्या बलिदान , त्याग , समर्पण आणि समय सूचकतेमुळे घर, कुटुंब, समाज आणि राष्ट्राची उन्नती झाली आहे. स्त्रियांच्या बलिदानातून, योगदानातून या देशातील संस्कार आणि संस्कृती टिकून आहे . हे संस्कार आणि संस्कृती भविष्यात चिरकाल टिकवण्यासाठी महिला व मुलींनी परिश्रमपूर्वक प्रयत्न करावेत . यासाठी कुटुंबातील दुरावत आलेला संवाद सुसंवादात बदलावा असे मत कथाकार तथा पत्रकार राम तरटे यांनी व्यक्त केले. अर्धापूर तालुक्यातील ऑक्सफर्ड इंग्लिश मिडियम स्कूल दाभड येथे महिला दिनानिम्मित पालक महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी सौ शालिनी सूर्यवंशी यांची उपस्थिती होती. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेच्या सचिव ऋतिका सूर्यवंशी ,वंदना लोखंडे,उपाध्यक्ष रामकृष्ण लोखंडे आदींची यावेळी उपस्थित होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य रवींद्र सूर्यवंशी यांनी केले. सुप्रसिद्ध ग्रामीण कथाकार राम तरटे यांच्या कथाकथनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ग्रामीण भाषेतील दोन विनोदी कथा ‘ मुस्तापूरची खीर ‘ आणि ‘ बारा आण्याची बोंब ‘ या त्यांच्या ग्रामीण बोली भाषेतील कथांनी उपस्थित महिलांचा आनंद द्विगुणित झाला. याचवेळी रोहिणी सावंत,पोलिस पाटील प्रतीक्षा सावळे या माता पालकांनी आपले मनोगत व्यक्त केले.तर ओमश्री अमेटवाड यांनी गीत सादर केले. शाळेच्या विद्यार्थिनी हर्षदा शिप्परकर,श्रध्दा अमेटवाड,अश्विनी कदम यांनी केलेल्या तडाखेबाज भाषणाने महिलांच्या टाळ्या मिळविल्या . कार्यक्रमात शिष्यवृत्ती परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थी अंजली आठवले,श्रध्दा आमेटवाड,अश्विनी कदम,अक्षय पांचाळ,श्रीनिवास टेकाळे,श्रेयस बारसे, यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधव भंडारे आणि सोनल गोमासे यांनी केले. महिलांसाठी संगीत खुर्ची,बकेट बॉल,झटपट एक मिनिटात उखाणे स्पर्धा, ,झटपट फुगे फुगवून फोडण्याची स्पर्धा चे आयोजन करण्यात आले होते. स्नेहा जमदाडे,वर्षा कल्याणकर,वनिता राऊत,वैष्णवी सल्कमोडे,अश्विनी व्यवहारे ,सपना कदम,वैशाली सावते,गायत्री कल्याणकर,शिल्पा रणिते,संगीता कल्याणकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विश्वनाथ जाधव,सतीश हुडे,शेख वाजिद यांनी परिश्रम घेतले. Kanthak Suryatal Post Views: 646 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation नांदेड शहरातील वाहतूक कोंडी वाढवणाऱ्या जड वाहनांवर प्रशासनाने तातडीने अंकुश ठेवावा नांदेडचा सुपुत्र भारतीय सैन्यात लेफ्टनंट – सरदार रमणज्योतसिंघ यांची प्रेरणादायी कामगिरी