नांदेड (प्रतिनिधी)मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून गोरठा जिल्हा नांदेड येथील वरदानंद प्रतिष्ठानच्या वतीने प्रतिवर्षी वेगवेगळ्या प्रांतात काम करणाऱ्या एका महिलेला काशीबाई भाऊराव फुलारी स्मृती नारायणी पुरस्कार दिला जातो.
वर्ष २०२६ चा पुरस्कार गेवराई जिल्हा बीड येथील प्रीती संतोष गर्जे यांना जाहीर झाल्याचे प्रतिष्ठानचे संचालक पत्रकार विठ्ठल फुलारी यांनी कळवले आहे. रोख रक्कम ५००० रुपये , मानपत्र , सन्मान चिन्ह आणि ग्रंथ भेट असे या पुरस्काराचे स्वरूप असून गोरठा येथे होणाऱ्या सहाव्या मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यामध्ये संमेलनाचे अध्यक्ष आणि उद्घाटक यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येईल.
यापूर्वी हा पुरस्कार हा ये मुुमकीन है या ग्रंथाचे लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या डॉ. तरु जिंदल आणि विख्यात लेखिका प्रा. ललिता गादगे यांना प्रदान करण्यात आला होता. प्रीती संतोष गर्जे ह्या अनाथ मुलांची आई म्हणून सर्व दूर परिचित आहेत. गेवराई पासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या निसर्गरम्य परिसरात खंडोबाच्या माळावर त्यांनी अनाथ मुलांसाठी सहारा अनाथालय निर्माण केले असून येथे शंभराच्या वर अनाथ मुलांचे ते सर्व अर्थाने पोषण करतात. सहारा अनाथालय या संस्थेमार्फत आता बालग्राम, युवाग्राम, गुरुग्राम आणि कृषीग्राम हे प्रकल्प विकसित होत आहेत. प्रीती गर्जे यांना मिळालेल्या या सन्मानाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.