नांदेड – महाराष्ट्र विधान परिषदेच्या नांदेड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत अमरनाथ अनंतराव राजूरकर यांनी एकतर्फी विजय मिळवत प्रतिस्पर्ध्यांवर मोठी आघाडी घेतली आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाहीर केलेल्या अधिकृत निकालानुसार राजूरकर यांना प्रथम पसंतीची तब्बल 339 मते मिळाली असून त्यांनी आवश्यक कोट्यापेक्षा मोठी आघाडी घेत विजय निश्चित केला. निवडणुकीत एकूण 451 मते पडली होती. त्यापैकी 428 मते वैध ठरली, तर 23 मते अवैध घोषित करण्यात आली. या निवडणुकीत एक जागेसाठी मतदान झाले असून विजयसाठी आवश्यक कोटा 215 मतांचा निश्चित करण्यात आला होता. निकालानुसार उमेदवारांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे आहेत : अमरनाथ अनंतराव राजूरकर – 339 मते कृष्णा नागेश पाटील – 84 मते प्रशांत विराज इंगोले – 5 मते अमरनाथ राजूरकर यांनी आवश्यक 215 मतांच्या कोट्यापेक्षा तब्बल 124 मते अधिक मिळवत दणदणीत विजय संपादन केला. त्यांच्या विजयामुळे समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींनी मोठ्या प्रमाणात राजूरकर यांच्या बाजूने कौल दिल्याचे या निकालातून स्पष्ट झाले आहे. मतमोजणीच्या पहिल्याच फेरीत त्यांनी निर्णायक आघाडी घेतल्याने विजयाचा मार्ग सुकर झाला. या निकालामुळे नांदेड जिल्ह्यातील राजकीय समीकरणांवरही दूरगामी परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.अधिकृत निकाल जाहीर होताच समर्थकांनी जल्लोष साजरा केला असून अमरनाथ राजूरकर यांच्या विजयाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींनी दिलेला विश्वासाचा कौल मानला जात आहे. Kanthak Suryatal Post Views: 973 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation जंतरमंतरवरील सीजेपीचे आंदोलन: तिसरा दिवस आणि नवा संघर्ष भारत-पाकिस्तान तणाव: युद्धाची धमकी आणि वस्तुस्थिती