नांदेड (प्रतिनिधी)- जागतिक योग दिनानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमांमध्ये अवघ्या 12 वर्षांच्या अर्जुन मनीकुमारी अनिल डांगे या बालयोगपटूने आपल्या अप्रतिम योगकौशल्याने उपस्थितांची मने जिंकली. योगातील अत्यंत कठीण मानल्या जाणाऱ्या इंट्युशन प्रोसेस (प्रज्ञा योगा) आणि विविध योगासनांचे सादरीकरण करत अर्जुनने सर्वांना आश्चर्यचकित केले. दि. 20 जून रोजी जिल्हा न्यायालयात आयोजित कार्यक्रमात प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश रम्मी यांच्या उपस्थितीत अर्जुनने योग प्रात्यक्षिके सादर केली. त्याच्या लवचिकतेचे, संतुलनाचे आणि एकाग्रतेचे दर्शन पाहून उपस्थित अधिकारी व नागरिकांनी त्याचे कौतुक केले. त्यानंतर 21 जून रोजी जागतिक योग दिनानिमित्त पोलीस कवायत मैदानावर आयोजित कार्यक्रमात पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, अधिकारी राहुल कर्डिले तसेच जिल्ह्यातील अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी अर्जुनने सादर केलेल्या विविध योगमुद्रा आणि संतुलनात्मक आसनांनी सर्वांना थक्क केले. अल्पवयातच योग क्षेत्रात उल्लेखनीय प्राविण्य मिळवलेल्या अर्जुन डांगेच्या या कामगिरीमुळे उपस्थितांनी त्याचे भरभरून अभिनंदन केले. त्याच्या या यशामुळे इतर विद्यार्थ्यांनाही योगाकडे आकर्षित होण्याची प्रेरणा मिळाली आहे. Kanthak Suryatal Post Views: 690 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation भारत-पाकिस्तान तणाव: युद्धाची धमकी आणि वस्तुस्थिती नांदेडमध्ये घरफोडी व चोरीच्या दोन घटना; लाखोंचा ऐवज लंपास