लिंबगाव (प्रतिनिधी)- पिंपरी महिपाल येथे माता रमाई जयंती साजरी करण्यात आली आणी मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकी दरम्यान शालेय विद्यार्थ्यांनी विविध कला गुण सादर केले. त्या मधे लेझीम पथकाने अती उत्कृष्ट कला गुण सादर केले. त्या मुलांच्या लेझीम पथकाच्या कला गुणांवर प्रभावित होऊन लिंबगाव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सय्यद, पोलीस पोलीस अंमलदार निवृत्ती रामनबईनवाड, बीट जमादार, रितेश टाक, गोपनीय शाखेचे अंमलदार देशमुख यांच्या हस्ते मुलांना विविध प्रकारचे बक्षीस वितरण करण्यात आले. त्या मध्ये वही, पेन बक्षीस देऊन शालेय मुलांचा व मुलींचा उत्साह द्विगुणित करण्यात आला. मंडळा तर्फे आयोजित कार्यक्रमात पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचा यथोचित्त सत्कार करण्यात आला व जयंती उत्साहात व शांततेत पार पडली.
More Related Articles
बिलोलीत अवैध रेती उत्खननावरून वाद पेटला; तहसिलदारांवर आरोप, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू
नांदेड (प्रतिनिधी) – बिलोली तालुक्यातील शासकीय रेती घाटांमध्ये सुरू असलेल्या कथित गैरप्रकारांमुळे प्रशासन आणि राजकीय…
” अरुणोदय ” सिकलसेल विशेष मोहीम भोकर शहरातील नागरिकांची होणार सिकलसेल तपासणी
भोकर : महाराष्ट्र राज्यातील सिकलसेल आजाराचे प्रमाण अधिक असलेल्या २१ जिल्ह्यांमध्ये १५ जानेवारी ते ७…
बारड येथे गळ्यातील मंगळसूत्र चोरी
नांदेड (प्रतिनिधी)- मुदखेड तालुक्यातील बारड येथे एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची…
