लिंबगाव (प्रतिनिधी)- पिंपरी महिपाल येथे माता रमाई जयंती साजरी करण्यात आली आणी मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकी दरम्यान शालेय विद्यार्थ्यांनी विविध कला गुण सादर केले. त्या मधे लेझीम पथकाने अती उत्कृष्ट कला गुण सादर केले. त्या मुलांच्या लेझीम पथकाच्या कला गुणांवर प्रभावित होऊन लिंबगाव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सय्यद, पोलीस पोलीस अंमलदार निवृत्ती रामनबईनवाड, बीट जमादार, रितेश टाक, गोपनीय शाखेचे अंमलदार देशमुख यांच्या हस्ते मुलांना विविध प्रकारचे बक्षीस वितरण करण्यात आले. त्या मध्ये वही, पेन बक्षीस देऊन शालेय मुलांचा व मुलींचा उत्साह द्विगुणित करण्यात आला. मंडळा तर्फे आयोजित कार्यक्रमात पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचा यथोचित्त सत्कार करण्यात आला व जयंती उत्साहात व शांततेत पार पडली. Kanthak Suryatal Post Views: 636 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation माता रमाई गणगोत पुरस्काराने निर्मलाबाई कांबळे सन्मानित पंचशिल बुद्ध विहार विश्वनाथ नगर नांदेड येथे त्यागमूर्ती माता रमाई जयंती मोठ्या उत्साहात साजरी