माता रमाई गणगोत पुरस्काराने निर्मलाबाई कांबळे सन्मानित

कंधार (प्रतिनिधी)-येथील सामाजिक कार्यकर्त्या निर्मलाबाई कांबळे यांना माता रमाई गणगोत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नांदेड आकाशवाणीचे कार्यक्रमाधिकारी राहुल आत्राम यांच्या हस्ते निर्मलाबाई कांबळे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या १२८ व्या जयंतीनिमित्त माता रमाई विचारमंच आणि माता रमाई जयंती मंडळ, जवळा दे ता.लोहा जि.नांदेड यांच्या वतीने शनिवारी, दि.७ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता माता रमाई गणगोत पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नांदेड आकाशवाणीचे कार्यक्रमाधिकारी राहुल आत्राम, तर प्रमुख पाहुणे म्हणून सोनखेड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग माने, भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा संघटक सुभाष खाडे, भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा संरक्षण सचिव आनंद गोडबोले, प्रसिद्ध स्तंभलेख भैय्यासाहेब गोडबोले, प्रसिद्ध साहित्यिका रुपाली वागरे, ख्यातनाम पत्रकार राजेश्‍वर कांबळे, माजी सरपंच साहेब शिखरे, जवळा दे चे पोलीस पाटील नितीन गवळी, माजी ग्रामपंचायत सदस्य प्रल्हाद मोरे, सामाजिक कार्यकर्ते अंकुश शिखरे, माता रमाई जयती मंडळाच्या अध्यक्षा भारतबाई निखाते, उपाध्यक्षा करुणाबाई गच्चे, भीमजयंती मंडळाचे अध्यक्ष भीमराव गोडबोले, सचिव मायाबाई गोडबोले, समता सैनिक दलाच्या केंद्रीय सहाय्यक शिक्षिका तेजस्विनी मस्के, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुरेश गोडबोले आदी मान्यवर उपस्थित होते.
या सोहळ्यात सामाजिक कार्यकर्त्या निर्मलाबाई कांबळे यांना माता रमाई गणगोत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नांदेड आकाशवाणीचे कार्यक्रमाधिकारी राहुल आत्राम यांच्या हस्ते निर्मलाबाई कांबळे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, भारताचे संविधान ग्रंथ, पदक, शाल, पुष्पहार, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पत्रकारिता क्षेत्रातील कर्तृत्ववान माता म्हणून हा पुरस्कार देण्यात आला आहे. लोकप्रिय पत्रकार राजेश्‍वर कांबळे यांच्या त्या मातोश्री आहेत. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!