भाजपा 3, राष्ट्रवादी 3, शिंदे सेना 2, कॉंगे्रस 2, मजपा आघाडी 2, शिवसेना उबाठा 1
नांदेड (प्रतिनिधी)-जिल्ह्यातील 12 नगर परिषद आणि 1 नगर पंचायतीच्या निवडणुकीचा निकाल दुपारी हाती आला. यात सत्ताधारी भाजपा आमदारांसह आमदार चिखलीकरांनाही मतदारांनी चांगलाच धडा शिकवला. यात नगराध्यक्ष पदासाठी भाजपा 3, राष्ट्रवादी 3, शिवसेना शिंदे 2, कॉंगे्रस 2, मराठवाडा जनहित पार्टी 2 आणि शिवसेना ठाकरे गट 1 असा निकाल मतदारांनी दिला असला तरी यात सत्ताधारी भाजप आमदार असणार्या मतदार संघातही नगराध्यक्ष पदाचा उमेदवार पराभूत झाला. तर दुसरीकडे आ.चिखलीकरांनी एक जागा राखत दुसरी जागा मात्र गमवली असल्याने भाजपासह चिखलीकरांनाही धक्का समजला जात आहे.
गेल्या अनेक वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका रखडल्या होत्या. अखेर या निवडणुकीला मुहूर्त सापडला आणि दोन टप्यात या निवडणुका पार पडल्या. पहिल्या टप्यात 2 डिसेेंबर तर दुसर्या टप्यात 20 डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली आणि दि.21 डिसेंबर रोज रविवारी मतमोजणीला सुरूवात झाली. दुपारी 12 वाजेपर्यंत तरी जवळपास सर्वच ठिकाणची निकाल हाती आले. जिल्ह्यात कुठेही अनूचित प्रकार घडू नये म्हून पोलीस प्रशासनानेही मतमोजणीच्या ठिकाणी तगडा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. खर्या अर्थाने सत्ताधारी भाजप आमदारांना धक्काच समजला जावा. यात किनवट नगर परिषदेवर शिवसेना उ.बा.ठा. गटाच्या नगराध्यक्षा विजयी झाल्या. उमरी आणि धर्माबाद नगर परिषदेवर राष्ट्रवादी आणि जनहित विकास पार्टी, मुखेड नगर परिषदेवर शिंदे शिवसेनेच्या उमेदवार विजयी झाल्या आहेत आणि देगलूर नगर परिषदेवर राष्ट्रवादी कॉंगे्रसचे नगराध्यक्ष विजयी झाले. देगलूर नगर परिषदेवर राष्ट्रवादी कॉंगे्रसचे वर्चव. याचबरोबर आ.चिखलीकर यांच्या मतदार संघातील दोन नगर परिषदेपैकी लोहा नगर परिषदेवर राष्ट्रवादीचे वर्चस्व असले तरी कंधार नगर परिषदेवर मात्र कॉंगे्रसने सत्ता कायम राखली. यामुळे भाजपासह राष्ट्रवादीच्या चिखलीकरांनाही नगराध्यक्ष पदावर विजयी मिळविता आला नसल्याने यांनाही हा धक्का समजला जात आहे. मतदारांनी समिश्र कल देत कोणत्याही एकाच पक्षाच्या बाजूने कौल दिला नसल्याने खर्या अर्थाने लोकशाही जीवंत असल्याचे नगर परिषदेच्या निकालातून दिसून आल्याचे स्पष्ट प्रतिक्रिया मतदारांतून ऐकावयास मिळत आहे.
नांदेड जिल्ह्यातील 12 नगर परिषद आणि 1 नगर पंचायतचा निकाल जाहीर
