भोकर (प्रतिनिधी)- येथील शहिद प्रफुल्ल नगर येथील रहिवाशी असलेले जवान सुधाकर श्रीराम कदम वय ३७ यांनी दि. १९ डिसेंबर रोजी पहाटे २ च्या दरम्यान पुणे येथील कमांड हॉस्पीटलमध्ये उपचारादरम्यान शेवटचा श्वास घेतला. ते आता आपल्यात नाहीत. देशसेवा करून तरुण वयात आपल्यातून कायमचे निघूण गेलेले जवान सुधाकरचे जाणे धक्कादायक, वेदनादायी आहे .
ते EME बटालियनमध्ये २ इंजिनियर रेजिमेंट मध्ये नायक या पदावर कार्यरत होते. दि. ३ डिसेंबर २०२५ रोजी ते १८ वर्षाची देशसेवा करून सेवानिवृत्त झाले. त्यांनी पंजाब , जम्मू काश्मीर , आसाम, अरुणाचलप्रदेश, राजस्थान, श्रीनगर , देहरादून आदी ठिकाणी देशसेवा करून आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावले. दि. २ डिसेंबर २०२५ रोजी नगरपरिषद निवडणूकीसाठी ते भोकरला होते.त्यांची अचानक तब्बेत बिघडल्यामुळे त्यांना पुणे येथे कमांड हॉस्पिटल मध्ये दाखल केले असता दि. १९ डिसेंबर २०२५ रोजी पहाटे २ च्या दरम्यान त्यांनी शेवटचा श्वास घेतला .आणि ते कायमचे आपल्यातून निघून गेले. जवान सुधाकरचे मुळ गांव सोमठाणा ता. नायगांव जि. नांदेड असून वडील स्व. श्रीराम कदम हे वनविभागात कार्यरत असल्याने ते भोकरवासी झाले. लहानपणापासूनचं सुधाकरला देशसेवेची आवड असल्याने सन २००८ मध्ये ते रेजिमेंटमध्ये नायक या पदावर रूजू झाले.शांत स्वभाव असलेल्या सुधाकर यांचा मित्र परिवार मोठा आहे. देशसेवा करतांना त्यांनी कुंटुबाकडे ही लक्ष दिले. पुणे येथे उपचार सुरू असतांना त्यांची पत्नी भाग्यश्री यांना ‘ शिवांश ‘ला का आणले नाही. असे विचारले. शिवांश त्यांचा एकुलता एक मुलगा , मुलासोबत त्यांची शेवटची भेट होणार होती. ते मुलाला काय बोलणार होते… हे जग सोडतांना मुलासोबत बोलायचे शेवटी राहून गेले…अर्ध्यावर पत्नीला सोडून जाणं…आई लक्ष्मीबाई च्या आधी जवान मुलगा गेला. त्या मातेचा किती आक्रोश…भाऊ ज्ञानेश्वरचा मोठा आधार गेला. बहीण ,कुंटुंब पोरके झाले. घर सुनसान झाले. सारे काही उद्ध्वस्त… निःशब्द … कदम परिवाराच्या दुःखात वास्तव न्यूज लाईव्ह परिवार सहभागी आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली ..
दि. २० डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता भोकर येथील हिंदू स्मशानभूमीत त्यांच्या पार्थीवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई , पत्नी , मुलगा, भाऊ , बहीण असा परिवार आहे .