नांदेड(प्रतिनिधी)-7/12 च्या नोंदीसाठी 10 हजार रुपयांची लाच स्विकारणाऱ्या तलाठ्याला विशेष न्यायाधीश डॉ.एस.डी. तावशीकर एक दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.
6 ऑक्टोबर रोजी तक्रारदाराने दिलेल्या अर्जानुसार त्यांची वडीलोपार्जित शेती मौजे कुष्णुर ता.नायगाव येथे गट क्रमांक 116, 146, 407 मध्ये मिळून 2 हेक्टर 21 आर आहे. त्या शेतीचे नाव वारसा हक्का प्रमाणे त्यांच्या वडीलांच्या नावावर 7/12 ची नोंद घेण्यासाठी कुष्णूर सज्जाचा तलाठी अशोक दिगंबर गिरी हा 20 हजार रुपयंाची लाच मागत आहे. 9 ऑक्टोबर रोजी दुपारी 11.30 वाजेच्यासुमारास तहसीलदार कार्यालय नायगाव समोर 20 हजार रुपयांची लाच मागणी करून तडजोडीनंतर 10 हजारांची लाच स्विकारण्यास संमत्ती दिली. दुपारी 2 वाजेच्यासुमारास 10 हजारांची लाच स्विकारतांना तलाठी अशोक दिगंबर गिरी (46) यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे. त्याचया अंगझडतीमध्ये 1660 रुपये आधार कार्ड, पॅन कार्ड, मोबाईल सापडला आहे. या प्रकरणी नायगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
आज पोलीस उपअधिक्षक राहुल तरकसे, पोलीस अंमलदार शेख रसुल, प्रकाश मामुलवार, प्रदीप कंधारे आदींनी पकडलेला तलाठी अशोक दिगंबर गिरी यास न्यायालयात हजर केले. जिल्हा सरकारी अभियोक्ता ऍड.रणजित देशमुख यांनी तपासाच्या प्रगतीसाठी पोलीस कोठडी देण्याची विनंती केली. आरोपीच्यावतीने ऍड. मनिष रामेश्र्वर शर्मा (खांडील) यांनी पोलीस कोठडी देण्यासारखा घटनाक्रम नाही असे सांगितले. युक्तीवादानंतर न्यायाधीश डॉ.एस.डी. तावशीकर यांनी एक दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.
दहा हजारांची लाच घेणारा तलाठी पोलीस कोठडीत
