विजयादशमी, धम्मचक्र प्रवर्तन दिन, हल्ला महल्ला, आरएसएस स्थापना दिवस उत्साहात साजरा

नांदेड(प्रतिनिधी)-आज पारंपारीक पध्दतीने विजयादशमी, हल्ला महल्ला, धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरे करण्यात आले. गोविंदा..गोविंदाच्या नावाने गजर झाला. वाहे गुरुजी का खालसाचा जयघोष गुंजला. नागरीकांनी एक दुसऱ्याला सणांसंदर्भाने शुभकामना प्रेषित केल्या आणि आनंद व्यक्त केला.
आज विजयादशमी, हल्ला महल्ला, धम्मचक्र प्रवर्तन दिन असे तिन समारोह एकाच दिवशी आले. सकाळपासूनच बालाजी मंदिरांमध्ये आणि देवीच्या मंदिरांमध्ये महिला, पुरूषांनी दर्शनासाठी गर्दी केली हेाती. गोविंदा..गोविंदाचा जयघोष दिवसभर सुरू होता. काही भाविकांनी पालखीमध्ये प्रभुंना नेऊन वेशीबाहेर शमीच्या झाडाखाली सिमोउल्लंघन केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला 100 वर्ष पुर्ण झाली. त्याही निमित्त दरवर्षीप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सेवकांनी कवायत काढली होती. या कवायतीवर जागो-जागी पुष्पवर्षाव होत होता.

सकाळपासूनच धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ दर्शन घेवून बौध्द धर्मीय नागरीक एक दुसऱ्याला शुभकामना देत होते. या ठिकाणी दर्शन घेणाऱ्यांमध्ये बौध्द धर्मीयांसह इतरांचाही समावेश होता. सायंकाळपर्यंत ही गर्दी कायम राहिली.
दुपारी 3 वाजता सचखंड श्री. हजुर साहिब येथून दसराच्या हल्ला महल्लाची मिरवणूक सुरू झाली. बोले सो निहालच्या जय घोषात ही मिरवणूक सायंकाळी 6 वाजता महाविर चौकात आली. तेथे प्रार्थना करून प्रातिनिधीक स्वरुपात हल्ला झाला आणि ही मिरवणूक पुढे गेली. ही मिरवणूक पुढे बाफना मार्गे परत गुरुद्वारा येथे येते.
गाडीपुरा भागातील बालाजी मंदिरातून भगवान व्यंकटेशांची रथात मिरवणूक काढण्यात आली. सायंकाळी या ठिकाणी रावण दहन करण्यात आले. अशाच प्रकारचे रावण दहन नवा मोंढा भागात झाले. बालाजी मंदिरातील व्यंकटेश्वरांची मिरवणूक वृत्त प्रसिध्द करेपर्यंत सुरू होती.

अशोकरावांनी सुध्दा संघाच्या मिरवणूकीवर पुष्पवृष्टी

जीवनभर काँग्रेस पक्षाची विचार धारणा बाळणुक राजकीय क्षेत्रात आज चव्हाण कुटूंबियांची तिसरी पिढी कार्यरत झाली आहे. काही दिवसांपुर्वी अशोक चव्हाण यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. 11 वर्षामध्ये यंदाच्याच वर्षीय भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरएसएस प्रमुख मोहनजी भागवत यांच्या जन्मदिनी 11 सप्टेंबर रोजी भारतातील सर्व अग्रगण्य वर्तमानपत्रांमध्ये स्वत:च्या शब्दांमध्ये प्रशंसा लिहुन वृत्त प्रकाशित केले होते. आज आरएसएसच्या स्थापनेला 100 वर्ष पुर्ण झाले आणि या निमित्ताने दरवर्षी निघणाऱ्या मिरवणुकीचे विशेष स्वागत करण्यात आले. या स्वागतामध्ये आरएसएसच्या चाहत्यांनी किंबहुना त्यांच्या विचारसरणीला मानणाऱ्यांनी त्या मिरवणुकीवर पुष्पवृष्टी करावी हे ठिकच आहे. पण आज खा.अशोक चव्हाण, माजी आ.अमरनाथ राजूरकर हे सुध्दा त्या मिरवणुकीवर पुष्पवृष्टी करतांना पाहुन नांदेडकरांच्या मनात कुठे तरी कणकण जाणवत होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!