सामाजिक कार्यकर्ते ओम बंडेवार यांनी भारदस्त शब्दात घेतला समाचार
नांदेड(प्रतिनिधी)-जगात घडणाऱ्या चांगल्या आणि वाईट घटनांना आपल्या शब्दांच्या माळेत पेरुन त्या घटना जनतेसमोर पोहचविण्याचे काम पत्रकारंाचे असते. परंतू नांदेडमधल्या “नमस्ते नांदेड’ या इंस्टाग्राम चॅनलच्या पत्रकारांनी सार्वजनिक ठिकाणी रस्त्यांवर विनोद करण्याचे काम सुरू केले आहे. खरे तर विनोद करणे हे विदुषकाचे काम असते. पण पत्रकार सुध्दा आता विदुषकी करायला लागले आहेत. याचा भरपूर समाचार ओम बंडेवार नावाच्या जागरुक युवकाने या विदुषकी करणाऱ्या पत्रकार रोहन जैन(कोंडेकर) चा भरपूर समाचार घेतला. या चॅनेलचे प्रमुख पद कोण्या गिरी नावाच्या व्यक्तीकडे आहे म्हणे. इतरांबद्दल चुकीच्या भावना पसरवून मी जगातील सर्वात चांगला व्यक्ती आहे हे दाखविण्यात या गिरीचा हातखंडा आहे.
“नमस्ते नांदेड” या इंस्टाग्राम चॅनेलचा पत्रकार रोहन जैनने हातात पोस्टर घेतलेले दोन फोटो व्हायरल करण्यात आले. एका पोस्टरमध्ये राखीपौर्णिमेच्या दिवशीचा तो फोटो आहे आणि त्यात मै बहन से बहुत प्यार करता हु, घरवाली के असे लिहुन त्यावर इमोजी टाकले आहे. भारतीय संस्कृतीत जन्म घेतलेल्या या रोहन जैनला अक्कल सुध्दा नाही काय? कारण जो भावजी आपल्या मेहुणीला आपल्या मुलीप्रमाणे समजतो तोच खरा भावजी असतो अशी भारतीय संस्कृतीमध्ये समज आणि परंपरा आहे. दुसरे एक पोस्टर पोळ्याच्या दिवशीचे आहे. त्यात घरात गरीब गाय आणि बाहेर खुला सांड असे शब्द लिहुन मित्रांनो आपला सण आला बैल पोळा असे त्यावर लिहिले आहे. हे पोस्टर सार्वजनिक ठिकाणी घेवून उभे राहिलेला हा जैन दात विचकून फोटो काढून घेत आहे. हे जैनचे कृत नमस्ते नांदेडने इंस्टाग्राम, फेसबुक आणि युट्युबवर प्रसारीतपण केले आहे.
आजच्या युगात सामाजिक संकेतस्थळांची चलती झाली आहे. त्यामुळे लाखो लोक या नमस्ते नांदेडचे फॉलोअर्स झाले आहेत. पण अशा विदुषकी कामांमुळेच फॉलोअर्स मिळवायचे असेल तर त्याला भरपूर वाव आहे. पण पत्रकारीतेचे नाव का घेतले जाते हा प्रश्न आम्हाला आमच्या शब्दांतून उपस्थित करायचा आहे. या चुकीच्या कामाची दखल ओम बंडेवार या युवकाने घेतली. धर्माच्या नावावर विदुषकी करणाच्या या प्रकाराचा ओम बंडेवार यांनी अत्यंत उत्कृष्ट भाषेत समाचार घेतला. ओम बंडेवार यांची भाषा उत्कृष्ट असली तरी पत्रकारीतेच्या बंधनामुळे आम्ही ती शब्दात लिहु शकत नाही. मला कोणत्या धर्माचा अपमान करायचा नव्हता असे सांगणारा जैन काय त्याची बुध्दी असेल ना की, आपल्या बायकोच्या बहिणीला खुप प्रेम करतो असे त्याने लिहिले आहे त्याने हा संदेश सार्वजनिक रित्या देण्याऐवजी आपल्या कुटूंबात द्यावा. तसेच घरात गरीब गाय आणि बाहेर सांड म्हणून बॅनर बनवल्याची जी कला जैनला आठवली त्यात बाहेर सांडांना वठणीवर आणणारे भरपूर जण आहेत याची जाण बहुदा त्याला नाही. सोबतच बैल पोळा हा सण साजरा यासाठी केला जातो की, बैलांनी वर्षभर मेहनत करून आमच्यासाठी अन्न तयार करण्यात घेतलेली मेहनत त्या मेहनतीची दखल घेण्यासाठी तो सण साजरा केला जात असतो. बाहेर सांडा सारखे वागून तर पाहावे जैनने एकदा मग त्याला जग दाखवेल की, इंजेक्शन कोठे दिले जाते.
पत्रकारीतेच्या नाव घेवून पत्रकारीतेला बदनाम करण्याच्या धंदा कोण्याच्या जोरावर हातात घेतला. हसविण्यासाठी विदुषकी करायची आहे काय? कराना मग कोण नको म्हणले पण त्यासोबत आपण पत्रकार असल्याचे जोडून काय साध्य करताय. नांदेड जिल्ह्यात अति पावसाने झालेल्या नुकसानीचे वर्णन करा. हसनाळ गावात लेंडी धरणाचे दार उघडले नसते तर 300 प्रेत उचलावे असते. याची रिपोर्टींग करा. विमानतळ बंद पडले आहे, ते काय बंद पडले, कोणी तयार केले होते. कोण कंत्राटदार होता, कोणी कमिशन खाले अशी शोध पत्रकारीता करा. तर समाज तुम्हाला नक्कीच मान्यता देईल. विदुषकी करून पत्रकारीतेचे नाव नक्कीच घेवू नका.
“नमस्ते नांदेड” या चॅनेलचा प्रमुख कोणी गिरी नावाचा व्यक्ती आहे म्हणे. जैन बंडेवार यांना सांगत होता अपलोड करण्याचे काम माझे नसते म्हणजे ते गिरीचे असते काय? हा प्रश्न उपस्थित होतो किंवा गिरीपेक्षा कोणी मोठा विदुषक या नमस्ते नांदेडमध्ये आहे काय? हाही प्रश्न उपस्थित होतो. बंडेवार जैनला सांगत होते की, हिम्मत असेल तर हिंदुंशिवाय दुसऱ्या धर्माची टिंगल कर पण हे करण्यासाठी जी मध्ये डी लागतो. तेंव्हा विदुषकी करून पत्रकारीतेचे नाव बदनाम करण्याऐवजी पत्रकारीता काय असते हे शिकले पाहिजे आणि गिरी तर ती पत्रकारीता शिकवूच शकत नाही. अशा या नमस्ते नांदेडच्या विदुषक पत्रकाराचा समाचार घेणाऱ्या ओम बंडेवारचे कौतुकच करायला हवे.
संबंधित ऑडिओ…
