नांदेड :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेंतर्गत शैक्षणिक वर्ष 2024-25 या वर्षातील विद्यार्थ्यांचे अर्ज महाआयटी या ऑनलाईन प्रणालीद्वारे छाननी करण्याची प्रक्रिया सुरु आहे. ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज पात्र झाले आहेत अशा विद्यार्थ्यांना दुसरा हप्ता देण्यासाठी त्यांची महाविद्यालयीन उपस्थिती 75 टक्के पेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज पात्र झाले आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांनी त्यांची महाविद्यालयीन उपस्थिती (‘B’Statement) महाआयटी या ऑनलाईन प्रणालीवर समाविष्ट करावी. त्यानंतर त्याची मूळ प्रत समाज कल्याण कार्यालयातील स्वाधार विभागात लवकर जमा करावी. जेणे करून पात्र विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या लाभापासून वंचित राहणार नाहीत, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे. राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील जे विद्यार्थी शासकीय प्रवेशास पात्र असुन प्रवेश मिळाला नाही अशा विद्यार्थ्यांना मट्रीकोत्तर शिक्षण घेता भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा विद्यार्थ्यांना स्वतः उपलब्ध करून घेण्यासाठी आवश्यक रक्कम संबंधित अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट वितरीत करण्यासाठी 13 जून 2018 व 26 डिसेंबर 2024 रोजीच्या शासन निर्णयान्वये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना ही राबविण्यात येत आहे. Kanthak Suryatal Post Views: 1,500 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation शेपटी घालणारी पत्रकारिता आणि लोकशाहीची किंमत सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियासाठी “वीर परिवार सहायता योजना”