नांदेड जिल्ह्यात खूनांच्या संख्येत वाढ

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा पोलीस दलाच्या अभिलेखानुसार मागील वर्षाच्या तुलनेत खूनांची वाढ झाली आहे. यामुळे नांदेड जिल्हा पोलीस दलाच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित होत आहे.
नांदेड जिल्ह्याची गुन्हे परिषद काही दिवसांपुर्वीच समाप्त झाली. त्यामध्ये मागील वर्षाच्या तुलनेत आठ खूनांची वाढ झाली आहे. या अर्थ असा आहे सध्या मे महिना संपलेला नाही. अजून वर्षाचे अजून सात महिने शिल्लक आहेत. एप्रिल महिन्यापर्यंतच ही वाढ झालेली आहे. तर पुढील सात महिन्यात काय होईल. याचा अंदाज बांधणे कठीन आहे. एकीकडे बातम्या लिहिणाऱ्यांना पित पत्रकारीता करता असे सांगितले जाते. बातम्यांचे सोर्स विचारण्यासाठी पत्रकारांना नोटीसा पाठविल्या जातात. पत्रकारांना सोर्स विचारणाऱ्या पोलीस विभागाने याचाही विचार करावा तुम्ही गुप्त माहितीदाराने दिलेल्या माहितीनुसार गुन्ह्याची उकल दाखवता. त्याची विचारणा सर्वोच्च न्यायालय सुध्दा तुम्हाला करत नाही. आजही भारताचे संविधान समाप्त झालेले नाही. त्यातील आर्टीकल 19(1)(अ) सुध्दा पत्रकारांना हा अधिकार देतो की, त्यांना प्राप्त झालेल्या माहितीनुसार त्यांनी बातम्या लिहायच्या असतात. पोलीस विभाग हा सत्ताधारी आहे असे मानले तर सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारताच तो विचारणारा व्यक्ती देशद्रोही होतो काय? याचे उत्तर सुध्दा नोटीस देणाऱ्यांना द्यावे लागेल.
आमच्याकडे प्राप्त असलेल्या माहितीनुसार आम्ही आज फक्त खूनांच्या गुन्ह्यांमध्ये झालेली वाढ लिहिलेली आहे. याशिवाय महिलांचा विनयभंग, बालकांवर लैंगिक अत्याचार, दरोडा, जिवघेणे हल्ले, चोऱ्या याची तर माहिती अजून उपलब्ध करून घ्यायची आहे. भाग 1 ते 6 प्रमाणे दाखल होणारे गुन्हे महत्वपुर्ण असतात. पण पत्रकारांना सोर्स विचारणारी नोटीस म्हणजे पोलीस खाते करील ते होईल असेच म्हणावे लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!