नांदेड – परिवहन्नेतर संवर्गातील मोटार सायकल वाहनांसाठी MH26- CU ही नविन मालिका लवकरच सुरु होणार आहे. ज्या अर्जदारांना पसंती क्रमांक घ्यावयाचा आहे त्यांचे आधार कार्ड, पॅनकार्ड, मोबाईल नंबर व ईमेल सह अर्ज 9 मे 2025 रोजी दुपारी 2.30 पर्यंत स्विकारण्यात येणार आहेत. त्यानंतर पसंती क्रमांकासाठी अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत. ज्या पसंती क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास 9 मे 2025 रोजी दुपारी 4 वाजता Text message/ दूरध्वनीद्वारे संबंधीत अर्जदारास कळविण्यात येईल. सर्वांनी याबाबतची नोंद घ्यावी असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे. Kanthak Suryatal Post Views: 1,238 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation शेत-पाणंद रस्ते अतिक्रमण मुक्तीसाठी “सस्ती अदालती” चे आज आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी पेन्शन अदालतीचे आयोजन