नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीसांनी एक हायवा आणि एक टॅम्पो अवैध वाळु घेवून जातांना पकडले आहे. नांदेड ग्रामीण पोलीसांनी जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत 21 लाख 90 हजार रुपये आहे. पोलीस उपअधिक्षक सुशिलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरिक्षक ओमकांत चिंचोळकर, पोलीस अंमलदार मोरे, मुपडे, भिसे, सिरमलवार, कांबळे, जमीर, कदम, मगर आदींनी बोंढार बायपास येथे 12 फेबु्रवारी रोजी रात्री 1.15 वाजेच्यासुमारास हायवा गाडी क्रमांक एम.एच.30 बीडी 2668 पकडला. त्यात अवैध पणे उपसा करून आणलेली 5 ब्रास वाळू होती. त्यानंतर चार तासांनी सकाळी 5 वाजता असर्जन पाण्याच्या टाकीजवळ पोलीसांनी टेम्पो क्रमांक 28 एच.7944 पकडला. त्यात 1 ब्रास अवैध वाळू होती. या दोन्ही प्रकरणांमध्ये ब्राम्हणवाडी येथील अंबादास गणेश बयने आणि जनार्धन गंगाराम लोणे रा.जुना कौठा नांदेड या दोघांविरुध्द भारतीय न्याय संहितेच्या कलम 303(2) प्रमाणे स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. Kanthak Suryatal Post Views: 1,235 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation संत रविदास महाराजांचे कार्य प्रेरणादायी – अॅड. गोधमगावकर अमेरिकेतून मोदी परत आल्याबरोबर महाराष्ट्रात होणार मोठा राजकीय भुकंप