*आज दुपारी ४.३० ला नांदेड येथे अंत्यसंस्कार* नांदेड :- नांदेड येथील निवासी असणारे व माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे अमरावती येथील उपसंचालक अनिल आलूरकर यांच्या मातोश्री श्रीमती वनमाला लालोजीराव आलूरकर यांचे वयाच्या 80 व्या वर्षी अल्पशा आजाराने अमरावती येथे आज निधन झाले. श्रीमती वनमाला लालोजीराव आलूरकर यांच्यावर आज बुधवार १५ जानेवारी रोजी नांदेड येथील गोवर्धन घाटावर दुपारी ४.३० वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. अंत्ययात्रा त्यांच्या शैलेश अपार्टमेंट पाटणुरकरनगर नांदेड येथील राहात्या घरातून निघेल. श्रीमती वनमाला लालोजीराव आलूरकर यांच्या पश्चात पवनकुमार लालोजिराव आलूरकर (मुलगा), अनिलकुमार लालोजीराव आलूरकर (मुलगा), प्रसाद लालोजीराव आलूरकर (मुलगा), अलका माधवराव चुकेवाड (मुलगी) व बराच मोठा आप्तपरिवार आहे. ईश्वर मृतात्म्यास शांती प्रदान करो. Kanthak Suryatal Post Views: 993 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation ‘ रंगभूषा,वेशभूषा नाटकाचे अभिन्न अंग : अभिनेते सुनील ढवळे माळटेकडी पुलाखाली झालेल्या खूनाचा उलगडा स्थानिक गुन्हा शाखेने केला