नांदेड :- जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी कार्यालय नांदेड यांच्यामार्फत निर्गमीत, अभिलेखात नोंद असलेले शस्त्र परवाने ज्याची मुदत 31 डिसेंबर 2024 रोजी संपुष्टात येत आहे अशा शस्त्र परवानाधारकांनी त्यांचा शस्त्र परवाना पुढील कालावधीसाठी नुतनीकरण करुन घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी नांदेड यांनी केले आहे. परवानाधारकाने पुढील कालावधीत आपला शस्त्रपरवाना नुतनीकरण करुन घेण्यासाठी नियमानुसार असलेले नुतनीकरण शुल्क (चलनाने) शासनास जमा करावे लागेल. आपले शस्त्रपरवान्यात नमुद असलेल्या अग्निशस्त्राची पडताळणी जिल्हादंडाधिकारी कार्यालयात करुन, विहित नमुन्यातील अर्ज, जन्म तारखेचा पुरावा, पॅन कार्ड, आधार कार्ड, एक पासपोर्ट फोटो व मुळ शस्त्र परवाना जिल्हादंडाधिकारी कार्यालय नांदेड येथे दाखल करावा. याची सर्व संबंधित जिल्ह्यातील शस्त्र परवाना धारकांनी नोंद घ्यावी, असेही आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी नांदेड यांनी केले आहे. Kanthak Suryatal Post Views: 2,198 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation पत्रकार संजय बुडकेवार यांचे निधन सेवानिवृत्तीनंतर मिळणाऱ्या संपत्तीची योग्य गुंतवणूक करा- अपर पोलीस अधिक्षक सुरज गुरव