नांदेड – गीतेमध्ये दृष्टांचा संहार करण्याची परिभाषा येते. परित्राणाय साधूनाम किंवा अभ्युत्थानम अधर्मस्य हे संबोध दुष्टांनाच संपवण्याची भाषा करतात. पण संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी पसायदान जे मागितले ते अद्वितीय आहे. खळांची व्यंकटी सांडावी आणि सत्कर्मी रती वाढावी हे मानवतावादी विचार ज्ञानेश्वराने पसायदानात मांडले आहेत. दुष्ट दुराचारी पण जगले पाहिजेत पण दुष्टातील दुष्टपणा निघून जावा असा मानवतावादी विचार पसायदानात येतो.एकूणच गीतेच्या तत्त्वज्ञानात ज्ञानेश्वरांनी मानवतावादाची भर घातली असून दुराचारी माणसे संपू नयेत तर त्यांचा दुष्टपणा संपावा हे समाजाला ज्ञानेश्वरांच्या पसायदाराने शिकवले. दुर्जनाचा दुष्टपणा संपावा त्याच्यातला निखळ माणूस उन्नत व्हावा हे पसायदानाने शिकवले असे प्रतिपादन साहित्यिक देवीदास फुलारी यांनी केले. फलटण जिल्हा सातारा येथील गोविंद काका उपळेकर संस्थानमध्ये आयोजित केलेल्या पसायदानातील सामाजिक आशय या विषयावर ते बोलत होते. प्रारंभी फलटण येथील गीता धर्म मंडळाचे अध्यक्ष प्रसिद्ध समीक्षक पुष्पाताई बाजीराव कदम यांनी प्रास्ताविक केले. प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी दोन दिवसांच्या गीताजयंती सोहळ्याचे आयोजन केल्याचे सांगून मागील 22 वर्षापासून हा उपक्रम चालू असल्याचे त्यांनी सांगितले . या कार्यक्रमात फलटण परिसरातील अनेक रसिक साहित्यिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
More Related Articles
जिल्हा व सत्र न्यायालय नांदेड येथे मुस्लीम ॲडव्होकेट तर्फे ईद ए मिलापचा कार्यक्रम संपन्न
नांदेड,(प्रतिनिधी)-आज मंगळवार रोजी जिल्हा व सत्र न्यायालय, नांदेड येथे मुस्लीम ॲडव्होकेट फोरम नांदेड तर्फे राष्ट्रीय…
वंचित बहुजन आघाडीचे सहा नवीन पक्ष प्रवक्ते जाहीर
नांदेड(प्रतिनिधी)-लोकसभा निवडणुकीनंतर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ऍड.प्रकाश आंबेडकर यांनी एक प्रसिध्दी पत्रक जारी करून राज्यात…
वृध्द माणसाची 80 हजारांची बॅग गायब करण्यासाठी त्यांच्या कपड्यावर रंग टाकला
नांदेड,(प्रतिनिधी)-एक व्यक्ती बॅंकेतून 80 हजार रुपये काढून जात असतांना त्याच्या कपड्यांवर रंग टाकून ती 80…