नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड न्यायालयाच्या परिसरात दोन वकीलांमध्ये आज झालेल्या तुंबळ हाणामारीने एका वकीलाचे डोके फुटले आहे. तसेच दुसऱ्या वकीलाचे हात फॅक्चर झाले आहे. वृत्तलिहिपर्यंत या संदर्भाची कोणतीही माहिती पोलीस ठाण्यात उपलब्ध नव्हती. प्राप्त झालेल्या खात्रीलायक माहितीनुसार आज दुपारी 12 वाजेच्यासुमारास न्यायालय परिसरातील पोलीस चौकीसमोर दोन वकीलांमध्ये भांडण झाले. काही जण सांगतात की ते वकील दोन वेगवेगळ्या पक्षकारांचे वकील आहेत त्यातून वाद झाला. तर कोणी सांगते की, विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालावर झालेल्या चर्चेतून भांडण झाले. काही जण सांगतात एक वकील सेवानिवृत्त सैनिक आहेत. झालेल्या मारहाणीत एका वकीलाचा हात फॅक्चर झाला आहे तर दुसऱ्या वकीलाचे डोके फुटले आहे. तेथून ते दोघे सरकारी रुग्णालय येथे गेले होते. पण वृत्तलिहिपर्यंत या संदर्भाची कोणतीही माहिती पोलीस ठाणे वजिराबादमध्ये उपलब्ध नव्हती. आम्ही लिहिलेली बातमी खात्रीलायक सुत्राच्या आधारावर असली तरी ज्या ठिकाणी भांडण झाले. त्या ठिकाणी सीसीटीव्ही सुध्दा आहेत. Kanthak Suryatal Post Views: 2,674 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation बिर्याणीच्या पार्टीत झालेल्या वादातून 19 वर्षीय युवकाचा खून पुढच्या तिन महिन्यात देशात मध्यवधी निवडणुकांच्यासोबत मोठा राजकीय भुकंप घडण्याची शक्यता ?