नांदेड(प्रतिनिधी)-कळमनुरी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार संतोष बांगर यांच्या पुतण्याला कळमनुरी शहरात पोटात गोळी मारण्यात आली आहे. त्यांना उपचारासाठी नांदेडमध्ये आणले असतांना त्यांची तपासणी करून पुढील उपचारासाठी हैद्राबाद येथे पाठविले आहे. नवनिर्वाचित आमदार संतोष बांगर हे सुध्दा त्यांच्यासोबत गेले आहेत. आज महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू होती. त्यात हिंगोली शहरापासून वाहणाऱ्या कयादू नदीजवळून पप्पु चव्हाण आपल्या गाडीत प्रवेश करत असतांना त्यांच्या गाडीवर दगडफेक झााली. दगडफेक झाल्यानंतर ते खाली उतरले आणि दगडफेक करणाऱ्यांना चोप दिला. त्यानंतर हिंगोली शहरातील अकोला वळण रस्त्यावर पप्पु चव्हाण यांच्या घरी नवनिर्वाचित आमदार संतोष बांगर यांचे पुतणे राजेंद्र श्रीराम बांगर यांनी आपल्या साथीदारांसह पोहचले. तेथे सुरू झालेल्या भानगडीत पप्पु चव्हाण यांनी राजेंद्र बांगर यांच्या पोटात गोळी मारली. खात्रीलायक सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जखमी अवस्थेतील पप्पु चव्हाण यांना घेवून नवनिर्वाचित आमदार संतोष बांगर हे नांदेडला खाजगी रुग्णालयात आले. तेथे त्यांची तपासणी केल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना पुढील उपचारासाठी हैद्राबाद येथे जाण्यास सांगितले आहे. नवनिर्वाचित आमदार संतोष बांगर यांनी आपल्या पुतण्याला घेवून हैद्राबादकडे रवाना झाले आहेत. Kanthak Suryatal Post Views: 5,785 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation यापुढे भारतात निवडणुका न घेतलेल्याच बऱ्या नांदेड जिल्ह्यातील 9 विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीत भाजपचे 5, शिवसेनेचे 3 तर राष्ट्रवादी काँग्रेसचा 1 उमेदवार विजयी*