नांदेड(प्रतिनिधी)-सार्वत्रिक लोकसभा पोट निवडणुक आणि विधानसभा निवडणुकीसाठी सेवानिवृत्त झालेल्या पोलीसांनी आपल्या सेवा द्याव्यात असे पत्र पोलीस अधिक्षक अबिनाशकुुमार यांनी सेवानिवृत्त पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार संघटना यांना पाठविले आहे. सध्या महाराष्ट्रासह नांदेड जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीचा जोर सुरू आहे. नांदेड जिल्ह्यात विधानसभेसह लोकसभेची पोट निवडणुक सुध्दा आहे. महाराष्ट्र राज्यात सर्व निवडणुका एकाच दिवशी होत असल्याने जिल्हा पोलीस दलाला 18 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर अशा तिन दिवसांसाठी मनुष्यबळाची मोठ्या प्रमाणावर आवश्यकता आहे. त्यानुसार सेवानिवृत्त पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदारांच्या संघटनेने आपल्या संघटनेतील इच्छूक सदस्यांची नावे, पद, मोबाईल नंबर आणि त्यांना कर्तव्यबजावण्यासाठी सोयीचे असलेले ठिकाण याबाबतची माहिती पोलीस अधिक्षक कार्यालयास पाठवावी असे पत्रात नमुद केले आहे. Kanthak Suryatal Post Views: 1,397 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation कुंडलवाडी पोलीसांनी चोरीचा गुन्हा उघड करून 100 टक्के जप्ती केली रिपब्लिकन सेनेच्यावतीने पाच निर्धार सभा आणि पदयात्रेचे आयोजन