नांदेड(प्रतिनिधी)-आज दिवाळी सणानिमित्त सचखंड श्री हजुर साहिब येथून निघालेली हल्ला महल्ला मिरवणूक बोले सो निहाल सत श्री अकालच्या गजरात शहरातील महाविर चौकातून प्रतिकात्मक हल्ला करत पुढे निघाली. दिवाळी सणानिमित्त सचखंड श्री हजुर साहिब येथे सुध्दा अनेक कार्यक्रमांचे आयोजन होत असते. दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी हल्ला महल्ला मिरवणूक निघते. त्या अगोदर तख्त स्नान हा समारोह होत असतो, दिपमाला हा कार्यक्रम होत असतो. त्यानंतर दिवाळीनंतरच्या दुसऱ्या दिवशी गुरू ग्रंथ साहिबजीचे आगमन होते. ही मिरवणूक गुरुद्वारा लंगर साहिब येथून निघते आणि सचखंड श्री हजुर साहिब येथे या मिरवणुकीचा समारोप होतो. आज दुपारी 3 वाजता सचखंड श्री हजुर साहिब येथील मुख्य जत्थेदार संत बाबा श्री. कुलवंतसिंघजी, संत बाबा जोतिंदरसिंघजी आणि इतर पंचप्यारे साहिबांनी मिरवणूकीला निरोप दिला. दोन्ही संत मिरवणुकीसोबत महाविर चौकापर्यंत आले. या मिरवणूकीत बालक आणि युवकांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला. अनेक जागी निशाण साहिब यांची अनेकांनी आरती केली आणि अशिर्वाद प्राप्त केले. महाविर चौकात बोले सो निहाल सत श्री अकालच्या गजरात प्रतिकात्मक हल्ला करत ही मिरवणूक पुढे निघाली. ही मिरवणूक अनेक मार्गांनी जात रात्री 9 वाजेच्यासुमारास सचखंड श्री हजुर साहिब येथे पोहचते. पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, अपर पोलीस अधिक्षक सुरज गुरव, उपविभागीय पोलीस अधिकारी सुशिलकुमार नायक यांच्यासह शहरातील अनेक पोलीस निरिक्षक आणि अनेक पोलीस अधिकारी, अंमलदारांनी या मिरवणुकीत बंदोबस्त ठेवला होता. Kanthak Suryatal Post Views: 1,522 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation प्रेमप्रसंगातून आत्महत्या; गुन्हेगार आखाडा बाळापूर पोलीसांना अद्याप सापडले नाहीत गंगाखेड गुन्हे शोध पथकाने चोरीच्या सात दुचाकी पकडल्या