नांदेड (प्रतिनिधी)-नांदेड-तामसा रस्त्यावर एका ट्रकने ऍटोला दिलेल्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू झाला आहे तर इतर दोन जखमी झाले आहेत. दि.25 ऑक्टोबर रोजी रात्री नांदेड-तामसा रस्त्यावरील लोहा पाटी येथे एका ट्रकने एका ऍटोला धडक दिली. या ऍटोमध्ये बसलेल्या प्रवाशांपैकी नामदेव गोविंद डवरे (38) रा.वाडी ता.हदगाव जि.नांदेड यांचा मृत्यू झाला. ऍटोमधील इतर प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तामसा पोलीसांनी ट्रक ताब्यात घेतला आहे. या धडकेत ऍटोचा चेंदा-मेंदा झाला आहे . ऍटोचा क्रमांक एम.एच.26 ए.के.3460 आहे. ऍटोला धडक देणाऱ्या ट्रकचा क्रमांक एम.एच.26 ए.डी.0874 आहे. वानवाडी येथील तुळशीराम श्रीहरी मुकाळे(50), बालाजी धोंडबा गवळे (45) आणि पुंजाराम भागवत खरोडे (28) हे जखमी आहेत. या सर्वांना शासकीय रुग्णालया विष्णुपूरी येथे उपचार सुरू आहेत. Kanthak Suryatal Post Views: 892 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation धर्माबाद येथे दोन दिवसांपुर्वी दाखल झालेल्या मारहाण प्रकरणात काऊंटर गुन्हा दाखल नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेत बीट बदलले म्हणे…