नांदेड, (प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्याच्या हदगाव तालुक्याच्या पश्चिमेस असलेल्या सावरगाव येथे आज सकाळी भूकंपाचा सौम्य झटका जाणवला आहे. कोणतीही हानी या झटक्यामुळे झालेली नाही. जिल्हा आपातकालीन कार्य केंद्राचे अधिकारी किशोर कुर्हे यांनी दिलेल्या माहितीनुसार आज सकाळी सावरगाव तालुका हदगाव येथे 6.52 वाजता भूकंपाचा झटका आला.भूमापक यंत्रावर याची तीव्रता 3.8 इतकी मोजली गेली आहे. जमिनीखाली 5 किलोमीटर भूकंप केंद्र बिंदू आहे. या भूकंपामुळे कोणतीही जीवित व वित्तहानी झालेली नाही Kanthak Suryatal Post Views: 1,253 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation खाजगी एजंटाच्या फोन पेवर 20 हजाराची लाच घेणारे मरखेलचे सहाय्यक पोलीस निरिक्षक संकेत दिघे, पोलीस अंमलदार आणि एक खाजगी इसम यांच्याविरुध्द गुन्हा दाखल ‘ ज्ञानतीर्थ ‘ युवक महोत्सवात धर्माबादच्या ‘आदिम ‘ एकांकिकेने केले रसिकांना मंत्रमुग्ध