ऍटो चालकांच्या वाहनतळाची जागा पत्रकार याहिया खानने बळकावली

नांदेड(प्रतिनिधी)-देगलूर नाका परिसर हा अत्यंत गर्दीचा परिसर आहे आणि या भागात वाहनांची नेहमीच कोंडी होत असते. या परिस्थितीत ऍटो चालकांना 10 ऍटो उभे करण्यासाठी दिलेल्या महानगर पालिकेच्या जागेवर पत्रकार याहिया खान याची चार चाकी गाडी उभी राहते. इतरांना कायद्याचे, नियमांचे धडे शिकवणाऱ्या याहिया खानला आपण अतिक्रमण करून आपली चार चाकी गाडी वाहनतळ करतो याची जाणिव नसावी हे दुर्देव.
आज प्राप्त झालेल्या एका छायाचित्रानुसार एम.एच.24 व्ही.0815 ही चार चाकी गाडी ऍटो थांबा लिहिलेल्या बोर्ड जवळ उभी करण्यात आलेली होती. ही जागा नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेने ऍटो चालकांना आपले ऍटो वाहनतळ करण्यासाठी दिलेली आहे. त्या ठिकाणी दहा ऍटो उभी राहू शकतात असे मनपाच्या बोर्डावर लिहिलेले आहे. छायाचित्रातील गाडी नेहमी याहिया खान हा पत्रकार वापरतो. म्हणजे ती गाडी त्याचीच आहे. ऍटोसाठी असलेल्या वाहनतळात आपली चारचाकी गाडी उभी करून याहिया खानने कायद्याची पायमल्लीच केली आहे. त्याच परिसरात महानगरपालिकेच्या जागेवर अतिक्रमण करून पुकार, माझा महाराष्ट्र आणि स्टार माझा न्युज याचे कार्यालय थाटले आहे असे अनेक जण सांगतात. चार चाकी गाडी उभी केली आहे. त्या ठिकाणी या सर्व प्रसार माध्यमांची नावे असलेला बोर्ड सुध्दा लटकत आहे.
जनतेला, शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना, व्यापाऱ्यांना नियम दाखवून बातम्या प्रसिध्द करण्यात पटाईत असणाऱ्या या पत्रकार याहिया खानने अतिक्रमण करून कार्यालय थाटावे आणि अतिक्रमण करून ऍटो चालकांची जागा आपली गाडी तळ करण्यासाठी वापरावी यापेक्षा या पत्रकारीतेली दुर्देव ते काय?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!