भोकर (प्रतिनिधी) – दुगाव फाटा ते भोकरदरम्यान बसने प्रवास करणाऱ्या महिलेच्या बॅगेतील सोन्या-चांदीचे दागिने अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना १३ नोव्हेंबर रोजी दुपारी घडली. या प्रकरणी भोकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ललिता शिवशंकर इक्कळे (वय ३५, रा. आदिलाबाद) या १३ नोव्हेंबर रोजी दुपारी १ ते ३.४५ वाजेदरम्यान दुगाव फाटा येथून भोकरकडे जाणाऱ्या बसमधून प्रवास करीत होत्या. यावेळी त्यांच्या बॅगेमध्ये ठेवलेले १ लाख ३८ हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने अज्ञात चोरट्याने चोरून नेले. याप्रकरणी ललिता इक्कळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून भोकर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ६०४/२०२६, भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०३(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल केळकर करीत आहेत. जमिनीच्या व्यवहारात २ कोटी ८० लाखांची फसवणूक; दोघांविरुद्ध गुन्हा धर्माबाद – जुन्या ओळखीचा आणि घनिष्ठ संबंधांचा गैरफायदा घेत शेतजमिनीच्या व्यवहारात तब्बल २ कोटी ८० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तेलंगणा राज्यातील दोघांविरुद्ध धर्माबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपी सय्यद अय्युब अली सय्यद याकूब अली आणि सय्यद अस्लान अय्युबी सय्यद अय्युब अली ऊर्फ रेहान (दोघेही रा. अहमदपुरा कॉलनी, निजामाबाद, तेलंगणा) यांनी संगनमत करून फिर्यादी व त्यांच्या मुलगा मोहम्मद खान यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर रताळी (ता. धर्माबाद) येथील शेतशिवारातील सर्वे क्रमांक १३९/बी/२, १३९/ए/२ आणि १३९/बी/१ मधील ९३ हजार ३३३ चौरस फूट जागा देण्याचे मान्य करून फिर्यादीकडून २ कोटी ८० लाख रुपये घेतल्याचा आरोप आहे. मात्र, या व्यवहारातून आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर मोहम्मद शकील खान अफजल खान (वय ६२, रा. अहमदपुरा कॉलनी, निजामाबाद, तेलंगणा) यांनी धर्माबाद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून गुन्हा क्रमांक २९२/२०२६ अन्वये भारतीय दंड संहितेच्या कलम ४०९, ४२०, ४६८, ४७१ व ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि कराड करीत आहेत. Kanthak Suryatal Post Views: 384 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation वामननगरमध्ये घरफोडी; सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड लंपास