नांदेड (प्रतिनिधी) – भारत सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळ (CBFC), मुंबई च्या सल्लागार मंडळावर राजू यादव यांची सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे. या नियुक्तीमुळे नांदेडसह संपूर्ण यादव समाजात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या गौरवशाली निवडीबद्दल आज यदुकुल यादव मंडळ, वजीराबाद, नांदेड येथे यादव महासभा, यादव युवक संघ आणि मित्र परिवाराच्यावतीने त्यांचा जंगी सत्कार करण्यात आला. या सत्कार सोहळ्याला यादव समाजातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी यादव महासभेचे राष्ट्रीय सचिव बीशनकुमार यादव, राधाकिशनजी यादव, डॉ. कैलाश यादव, प्रभूलाल बटावाले, भारत भूषण यादव, गोपाल फतेलष्करी, ईश्वर बटावाले, राहुल ठाकुर, संजय फुलारी, सतीश यादव, राजेश कुलकर्णी, गोकुल यादव, शिवा काळे, स्वराज यादव, अजय यादव, सुंदरलाल बटावाले* आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी भव्य आतिषबाजी करून राजू यादव यांचा पुष्पहार, शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या या नियुक्तीबद्दल अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. चित्रपटसृष्टीत समाजाचे प्रश्न, संस्कृती आणि मूल्ये प्रभावीपणे मांडण्यासाठी राजू यादव यांची भूमिका महत्त्वाची ठरणार असल्याचा विश्वास यावेळी मान्यवरांनी व्यक्त केला. Kanthak Suryatal Post Views: 455 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation महाराष्ट्रात प्रत्येक जिल्हा न्यायालयाचे कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर अशोकराव चव्हाणांसह चार आमदारांना उडविण्याचा कट होता?,खंडणीखोर मुंबईतून जेरबंद; ‘ते चार आमदार कोण?’ या प्रश्नाने नांदेडमध्ये खळबळ