गुप्तधन काढण्यासाठी अघोरी कृत्य; खड्डा खोदताना संशयितांना पकडले, काही आरोपी फरार

अर्धापूर (प्रतिनिधी) –  गुप्तधन काढण्याच्या उद्देशाने अघोरी कृत्य करून जादूटोणा केल्याच्या संशयावरून अर्धापूर पोलिसांनी १३ जणांविरुद्ध जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. ही घटना १ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री सुमारे ११.१५ वाजण्याच्या सुमारास मो. कासारखेडा येथील मोकळ्या जागेत घडली. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित व्यक्ती अघोरी पद्धतीने कृत्य करून पाणी दम करून गुप्तधन काढण्याच्या उद्देशाने खड्डा खोदत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कारवाई केली. याप्रकरणी फिर्यादी पोलीस अंमलदार सुरेश भगवानराव भोसले यांच्या तक्रारीवरून अर्धापूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५९८/२०२६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात एकूण १३ जणांची नावे नमूद करण्यात आली आहेत. त्यामध्ये शेख असार शेख सत्तार, सुफियान अन्सार शेख आणि हासीम पठाण हे फरार असल्याचे नमूद आहे. इतर आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत.

गुन्ह्यातील आरोपींची नावे :

* शेख असार शेख सत्तार (फरार)

* सुफियान अन्सार शेख (फरार)

* मतिन अन्सार शेख (वय २७, रा. कासारखेडा, ता. अर्धापूर)

* हासीम पठाण (रा. बालूर, जि. परभणी, फरार)

* सय्यद रहीम सय्यद गफ्फुर (वय ४२, रा. मस्तानपुरा, ता. पूर्णा)

* संतोष रघुनाथसिंग ठाकूर (वय ४२, रा. महाराणा प्रताप चौक, ता. पूर्णा)

* रऊफ खान भौजम खान पठाण (वय ४९, रा. महाराणा प्रताप चौक, ता. पूर्णा)

* निझ मुजाहिदीन बेग (वय ३०, रा. निशानिया कॉलनी, छत्रपती संभाजीनगर)

* तुजिबखान जाफर खान पठाण (वय ३९, रा. मस्तानपुरा, ता. पूर्णा)

* जावेद रशीद शेख (वय ३८, रा. इंदिरानगर, बायजीपुरा, छत्रपती संभाजीनगर)

* शेख रिजवान शेख अजीम (वय ३०, रा. बारिकोलागी, रोशनगेट, छत्रपती संभाजीनगर)

* शेख यशिम शेख पाशा (वय ३४, रा. बाबर कॉलनी, छत्रपती संभाजीनगर)

* अफरोज आवेद फारुखी (वय ५१, रा. पडेंगाव, छत्रपती संभाजीनगर).

या प्रकरणी अर्धापूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३(५) तसेच महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक अधिनियमाच्या कलम ३(१)(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक भगत करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!