लातूर, नांदेड, परभणी व हिंगोलीतील ६६ विद्यार्थ्यांचा सहभाग 

नांदेड (प्रतिनिधी) – लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (नांदेड परिक्षेत्र) आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने दक्षता जनजागृती सप्ताह – २०२६ निमित्त भ्रष्टाचार निर्मूलन व जनजागृतीसाठी आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन ३० ऑक्टोबर २०२६ रोजी सायन्स कॉलेज, नांदेड येथे करण्यात आले होते. या वक्तृत्व स्पर्धेत लातूर, नांदेड, परभणी व हिंगोली जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांतील एकूण ६६ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (नांदेड परिक्षेत्र) चे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी भूषवले, तर उद्घाटन स्वा.रा.ती.म. विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. ज्ञानेश्वर पवार यांनी केले. या प्रसंगी अपर पोलीस अधीक्षक डॉ. अश्विनी जगताप, स्वा.रा.ती.म. विद्यापीठाचे रा.से.यो. संचालक डॉ. मारोती गायकवाड, सायन्स कॉलेजचे प्राचार्य डॉ. लक्ष्मण शिंदे आणि पोलीस उप अधीक्षक राहुल तरकसे यांची प्रमुख उपस्थिती होती.

स्पर्धेचे पारितोषिक विजेते स्पर्धक:

  • प्रथम क्रमांक (विभागून):
    1. कु. कस्तुरी श्रीकृष्ण पात्रुडकर (दयानंद लॉ कॉलेज, लातूर)
    2. प्रमोद दत्तात्रय घोडके (राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर)
  • द्वितीय क्रमांक (विभागून):
    1. योगेश भिका बडगुजर (शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, नांदेड)
    2. दत्ताहरी बाजीराव जाधव (सहयोग कॉलेज, नांदेड)
  • तृतीय क्रमांक (विभागून):
    1. राम वसंत जाधव (यशवंत महाविद्यालय, नांदेड)
    2. नितिन संजय नरवाडे (एस.जी.जी.एस. पत्रकारिता महाविद्यालय, नांदेड)

परीक्षण व आयोजन:

या वक्तृत्व स्पर्धेत अ‍ॅड. दीपा बियाणी, प्रा.डॉ. सागर कुलकर्णी व पोलीस निरीक्षक श्री बाबासाहेब थोरे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. संतोष देवराय यांनी केले. स्पर्धेतील सर्व सहभागी व विजेत्या विद्यार्थ्यांना पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण  कोकाटे यांच्या हस्ते बक्षीस व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. तसेच उपस्थित मान्यवरांनी सर्व विजेत्या व सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पोलीस उप अधीक्षक राहुल तरकसे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक सुरेश बनसोडे, श्रीमती प्रीती जाधव, श्रीमती माधुरी यावलीकर, कैलास मगर, सपोउपनि सुर्याजी वडजे, पोहेकॉ अरशद अहमद खान, पोहेकॉ यशवंत दाबनवाड, बालाजी मेकाले, किरण कपासे, जगन्नाथ अनंतवार, प्रदिप अंधारे, संतोष पुलगमवार, मेनका पवार, दीपिका शिंदे, गजानन राऊत, साईनाथ आचेवाड, ईश्वर जाधव व सय्यद खदीर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!