नांदेड (प्रतिनिधी)- महाराष्ट्र शासनाच्या ग्रंथालय संचालनालयातर्फे ग्रंथ निवड समितीने २०२४मध्ये प्रकाशित झालेल्या उत्तम, दर्जेदार ग्रंथांची यादी जाहीर केली असून यात नांदेड येथील इसाप प्रकाशनाच्या ७ पुस्तकांची निवड झाली आहे. आय. एस. बी. एन. नंबर असलेली, तसेच उत्तम साहित्य, सकारात्मक विचार करायला शिकविणारी आणि व्यक्तिमत्त्व विकासाला मदत करणारी पुस्तके वाचकांना मिळावीत यासाठी या पुस्तकांची निवड करण्यात आलेली आहे. इसाप प्रकाशनाची निवडलेली पुस्तके व त्यांचे लेखक/लेखिका पुढील प्रमाणे- माझं गाव माझी माणसं (कथा) – रा. रं. बोराडे, नादारीचा सातबारा (कवितासंग्रह) – शंकर वाडेवाले, तत्त्वज्ञ आचार्य डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन (चरित्र) – व्यंकटेश चौधरी, वाचू गाऊ नाचू आनंदे (बालकवितासंग्रह) – माधव चुकेवाड, श्री संतकवी दासगणु महाराज (चरित्र) – माधव चुकेवाड, शांतिदूत डॉ. मनमोहन सिंग (चरित्र) – वीरभद्र मिरेवाड, स्त्री आरोग्य (आरोग्य) – सुप्रिया पेडगावकर या पुस्तकांची निवड झाल्यामुळे या लेखक-लेखिकांना आनंद झाला आहे. याबद्दल अनेक साहित्यिक व वाचकांनी तसेच इसाप प्रकाशनाचे संचालक दत्ता डांगे व अ. भा. मराठी साहित्य महामंडळाचे सदस्य देवीदास फुलारी, माजी शिक्षण संचालक डॉ गोविंद नांदेडे, डॉ. पृथ्वीराज तौर, गटशिक्षणाधिकारी सुधीर गुठे, दिगंबर क्षीरसागर, राम तरटे, आनंद पुपलवाड, पंडित पाटील, विजयकुमार चित्तरवाड, अरुण अतनुरे पाटील, आदींनी पुस्तकांची निवड झालेल्या लेखकांचे अभिनंदन केले आहे. Kanthak Suryatal Post Views: 21 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation अन् शिवानी नळेगावे बसली प्राचार्यांच्या खुर्चीवर;पीपल्स कॉलेजमध्ये कॉलेज डे उत्साहात साजरा