शेतकऱ्यांनी रेशीम, दुग्ध व्यवसायातून उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत निर्माण करावेत;नुकसानीची वस्तुनिष्ठ नोंद घेण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना नांदेड (जिमाका) – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी आज लोहा तालुक्यातील सोनखेड येथील सोनखेड-कळंबर रस्त्यालगतच्या शेतशिवारात सोयाबीन व कापूस पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधून पिकांची स्थिती आणि नुकसानीची माहिती जाणून घेतली. पावसामुळे पिकांवर झालेला परिणाम, नुकसानीचे स्वरूप आणि शेतकऱ्यांच्या अडचणी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती घेतली. नुकसानीची वस्तुनिष्ठ नोंद घेऊन आवश्यक कार्यवाही करण्याच्या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी सूचना दिल्या. शेतीसोबत पूरक व्यवसायावर भर शेतकऱ्यांशी संवाद साधताना जिल्हाधिकारी कर्डिले यांनी शेतीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी रेशीम शेती, दुग्ध व्यवसाय यासह विविध पूरक व्यवसायांचा अवलंब करण्याचे आवाहन केले. उपलब्ध शासकीय योजनांचा लाभ घेऊन उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत निर्माण करावेत, असे त्यांनी सांगितले. यावेळी उपविभागीय अधिकारी विलास नरवटे, तहसीलदार विठ्ठल परळीकर, तालुका कृषी अधिकारी कासराळे यांच्यासह मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, सहाय्यक कृषी अधिकारी, कृषी विस्तार अधिकारी, शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते. Kanthak Suryatal Post Views: 532 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation महिला बचत गटांना सुवर्णसंधीः नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पातर्गत;कृषी औजारे बँक योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन दुष्काळाची बनावट यादी सोशल मीडियावर व्हायरलबाबत प्रशासनाकडून खुलासा;कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये