अर्धापूर (प्रतिनिधी) – गोवंशाची अवैध वाहतूक व जनावरांवरील क्रूरता रोखण्यासाठी नांदेड पोलिसांकडून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत अर्धापूर पोलिसांनी काझीगल्लीत कारवाई करून कोणतीही वैद्यकीय अथवा कायदेशीर परवानगी नसताना डांबून ठेवलेल्या ८ गोवंश जनावरांची सुटका केली. या कारवाईत सुमारे ३ लाख ६५ हजार रुपये किमतीची जनावरे जप्त करण्यात आली. पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशानुसार अर्धापूर पोलिसांना काझीगल्लीत जनावरे अवैधरीत्या डांबून ठेवल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानंतर पोलिस पथकाने पंचांसह घटनास्थळी जाऊन पाहणी केली. यावेळी गोवंश जातीची आठ जनावरे कोणत्याही प्रकारची वैद्यकीय किंवा कायदेशीर परवानगी नसताना डांबून ठेवल्याचे आढळून आले. या प्रकरणी दाऊत बाबु कुरेशी (रा. खुदबेनगर, नांदेड), बाबुखान पठाण (वय ३८, रा. नवी आबादी, अर्धापूर) आणि मोहम्मद अन्सार मोहम्मद बाबू यांच्याविरुद्ध अर्धापूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४९१/२०२६ अन्वये महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियमातील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अर्धापूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी मांजरकर तसेच पोलीस कर्मचारी भाऊराव पावडे, जमदाडे, घोरपडे आदींच्या पथकाने केली. संशयास्पद पद्धतीने गोवंशाची वाहतूक, कत्तल किंवा जनावरांवरील क्रूरतेची माहिती मिळाल्यास नागरिकांनी तत्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी किंवा डायल ११२ वर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. Kanthak Suryatal Post Views: 657 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation 15 हजारांची लाच स्विकारणारा शिपाई पोलीस कोठडीत शेतातील वीज जोडणीचा धक्का लागून तरुणाचा मृत्यू