चिखलीजवळ दगडफेक; वाहनाची तोडफोड, हातकडीसह आरोपी फरार किनवट (प्रतिनिधी)-चोरीच्या गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपीला घेऊन तेलंगणाकडे निघालेल्या पोलिसांच्या पथकावर किनवट तालुक्यात हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. किनवट–आदिलाबाद मार्गावर चिखली गावाजवळ आरोपीच्या नातेवाईकांनी पोलिसांचे वाहन अडवून दगडफेक केल्याची माहिती आहे. या हल्ल्यात पोलिसांच्या वाहनाची तोडफोड झाली असून, निर्माण झालेल्या गोंधळाचा फायदा घेत हातकडीसह आरोपी पसार झाल्याने पोलिस यंत्रणेत खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, किनवट तालुक्यातील चिखली येथील शेख वखार हा तेलंगणा राज्यातील आदिलाबाद जिल्ह्यातील बाजार पोलिसांच्या तपासात असलेल्या ऑटो चोरी प्रकरणातील आरोपी होता. तेलंगणा पोलिसांनी त्याला किनवट येथील चिखली परिसरातून अटक केली. त्यानंतर पोलिसांचे पथक आरोपीला घेऊन तेलंगणाकडे परत जात असताना चिखली गावाजवळ काही जणांनी पोलिसांचे वाहन अडवले.यानंतर पोलिसांच्या वाहनावर जोरदार दगडफेक करण्यात आल्याची माहिती आहे. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे पोलिसांना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. या गोंधळात आरोपी शेख वखार याने संधी साधत हातकडीसह जंगलाच्या दिशेने पलायन केल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, हल्लेखोरांना पांगवण्यासाठी तेलंगणा पोलिसांनी गोळीबार केल्याचीही माहिती समोर आली आहे. मात्र, या गोळीबाराबाबत अधिकृत तपशील अद्याप स्पष्ट झालेला नाही.घटनेनंतर तेलंगणा पोलिसांचे पथक किनवट पोलीस ठाण्यात दाखल झाले असून, हल्ला, वाहनाची तोडफोड आणि आरोपीच्या फरारीप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.पोलिसांच्या ताब्यातील आरोपीवर अशा प्रकारे हल्ला करून त्याला पळवून नेण्याचा प्रयत्न झाल्याने कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. चिखली परिसरात नेमके किती जण या हल्ल्यात सहभागी होते, हल्ल्यामागील कारण काय आणि फरार आरोपीचा ठावठिकाणा कुठे आहे, याचा तपास आता दोन्ही राज्यांच्या पोलिसांकडून केला जाणार आहे. संबंधित व्हिडीओ .. https://vastavnewslive.com/wp-content/uploads/2026/08/WhatsApp-Video-2026-08-30-at-21.24.09.mp4 Kanthak Suryatal Post Views: 1,795 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation परभणीत जुगार अड्ड्यावर पोलिसांचा सर्जिकल स्ट्राईक! जिद्दीला मिळाले यश; सोनवाडीच्या वानोळे कुटुंबाची शासकीय सेवेत दमदार भरारी!