३० लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल माळाकोळी (प्रतिनिधी) – नांदेड जिल्ह्यात अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेंतर्गत माळाकोळी पोलिसांनी विनापरवाना रेती वाहतूक करणारा हायवा पकडून तब्बल ३० लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. माळाकोळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हायवामधून अवैधरीत्या रेती वाहतूक केली जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिस पथकाने घटनास्थळी जाऊन नाकाबंदी केली. यावेळी MH-22 AN 5569 क्रमांकाचा टाटा कंपनीचा हायवा अडवून तपासणी केली असता त्यामध्ये अंदाजे चार ब्रास रेती आढळून आली. रेती वाहतुकीसाठी आवश्यक परवाना व कागदपत्रांबाबत चौकशी केली असता संबंधितांकडे कोणतीही वैध कागदपत्रे नसल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी पंचनामा करून हायवा व रेती असा एकूण ३० लाख २० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी गंगाधर संग्राम ढगे (वय ३६, व्यवसाय चालक, रा. भोगाव/राहटी, ता. पालम, जि. परभणी) याच्याविरुद्ध माळाकोळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३०३(२), ३(५) तसेच महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ मधील कलम ४८(७), ४८(८) अन्वये कारवाई करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक सूरज गुरव, माळाकोळीचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार इंगोले, पोलीस उपनिरीक्षक अंमलदार बालाजी रेड्डी व पथकाने केली. अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही कठोर कारवाई सुरू ठेवण्यात येणार असून, अशा बेकायदेशीर प्रकारांची माहिती पोलिसांना देऊन नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. Kanthak Suryatal Post Views: 697 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation संविधान विरुद्ध आरएसएस-भाजप विचारसरणी: देशातील दलितांच्या स्वाभिमानावर होणाऱ्या आघातांचे विश्लेषण! एक महिना मृतदेह पडून होता की मृतदेह आज आणून टाकला? पोलिसांसमोर अनेक अनुत्तरित प्रश्न!