तुप्पाजवळ कुजलेल्या अवस्थेत मृतदेह सापडल्याने खळबळ नांदेड (प्रतिनिधी) नांदेड शहरापासून काही अंतरावर असलेल्या तुप्पा परिसरात एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मृतदेहाची अवस्था पाहता हा मृत्यू काही दिवसांपूर्वी झाला असावा, अशी प्राथमिक चर्चा सुरू आहे. मात्र हा व्यक्ती नेमका कधी मरण पावला? मृत्यू नैसर्गिक आहे की घातपाताचा? आणि जर मृतदेह महिनाभर जुना असेल तर तो इतके दिवस याच ठिकाणी पडून असूनही कोणाच्या लक्षात कसा आला नाही? असे गंभीर प्रश्न आता उपस्थित झाले आहेत. स्थानिक नागरिकांनी पोलिसांच्या 112 हेल्पलाइनवर संपर्क साधल्यानंतर पोलिस यंत्रणा घटनास्थळी पोहोचली आणि मृतदेहाची माहिती समोर आली. मृतदेहाची स्थिती अत्यंत खराब असल्याचे सांगितले जात असून, त्यामुळे मृत व्यक्तीची ओळख पटवणे हे पोलिसांसमोरचे पहिले आणि मोठे आव्हान ठरणार आहे. या घटनेत सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे तो मृत्यूच्या ठिकाणाचा. जर संबंधित व्यक्तीचा मृत्यू महिनाभरापूर्वी याच ठिकाणी झाला असेल, तर परिसरातील नागरिकांना याची चाहूल इतके दिवस कशी लागली नाही? मृतदेहातून दुर्गंधी निर्माण झाली नसेल का? परिसरात ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या लक्षात तो आला नाही का? की हा मृतदेह इतरत्र नेऊन मारल्यानंतर किंवा मृत्यूनंतर तुप्पा परिसरात आणून टाकण्यात आला? ही केवळ चर्चा नाही, तर तपासाची दिशा ठरवणारे महत्त्वाचे प्रश्न आहेत पोलिसांना आता मृत व्यक्तीची ओळख पटविण्यासोबतच मृत्यूचा नेमका कालावधी, मृत्यूचे कारण, मृतदेह सापडलेल्या ठिकाणाचे स्वरूप, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन, कॉल रेकॉर्ड तसेच बेपत्ता व्यक्तींच्या नोंदी यांचा तपास करावा लागणार आहे. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यू नैसर्गिक आहे की संशयास्पद, याबाबत अधिक स्पष्टता मिळण्याची शक्यता आहे.एकीकडे महिनाभरापूर्वी मृत्यू अशी चर्चा, तर दुसरीकडे मृतदेह आजच आणून टाकला असावा असा संशय,या दोन शक्यतांमधील सत्य आता पोलिस तपासातूनच बाहेर येणार आहे. नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे दबंग पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोळकर यांच्या नेतृत्वाखाली या प्रकरणाचा तपास सुरू असून, या रहस्यमय मृत्यूमागचे वास्तव समोर आणणे हे पोलिसांसमोरचे मोठे आव्हान आहे. मृत व्यक्ती कोण? त्याचा मृत्यू नेमका कधी झाला? मृत्यूचे कारण काय? आणि या घटनेत कोणाचा सहभाग आहे का? या सर्व प्रश्नांची उत्तरे तपासातूनच मिळणार आहेत. तुप्पा परिसरातील या मृतदेहाचे गूढ नेमके काय? मृत्यू की घातपात? मृतदेह महिनाभर तिथेच होता की कुणीतरी आणून टाकला? या प्रश्नांची उत्तरे आता नांदेड ग्रामीण पोलिसांच्या तपासाकडे लागली आहेत. Kanthak Suryatal Post Views: 1,099 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation माळाकोळी पोलिसांची कारवाई; विनापरवाना रेती वाहतूक करणारा हायवा पकडला धर्माबादमध्ये अवैध गोवंश वाहतुकीवर कारवाई; २.८४ लाखांचा मुद्देमाल जप्त