नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड शहरातील बसस्थानक परिसरात मंगळवारी दुर्दैवी अपघात घडला. बसस्थानकातून बाहेर पडणाऱ्या एसटी बसची धडक बसल्याने 47 वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाला. बस स्थानकातून बाहेर निघत असताना संबंधित महिला बसस्थानकात प्रवेश करत होती. याचवेळी हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आहे. प्राप्त माहितीनुसार, उदगीरकडे जाणारी एसटी बस क्रमांक २४ एयू ५५४ ही बस बसस्थानकातून बाहेर पडत होती. त्याचवेळी अंजना गुलाबराव भरकडे, (३७) रा. कौडगाव, ता. लोहा या महिला बसस्थानकात येत होत्या. बस आणि महिलेचा नेमका संपर्क कशामुळे झाला, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. मात्र, बसची धडक लागल्यानंतर महिला गंभीर जखमी झाल्या आणि त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेमुळे बसस्थानक परिसरात काही काळ खळबळ उडाली. अपघाताची माहिती मिळताच संबंधित पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, बसस्थानकातून एसटी बस बाहेर पडताना तसेच प्रवासी बसस्थानकात ये-जा करत असताना सुरक्षिततेच्या दृष्टीने अधिक काळजी घेण्याची गरज पुन्हा एकदा या घटनेतून अधोरेखित झाली आहे. अपघात नेमका कोणत्या परिस्थितीत घडला, याचा तपास पोलीस करीत आहेत. तपासानंतरच अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. या दुर्दैवी घटनेमुळे मृत महिलेच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. Kanthak Suryatal Post Views: 1,077 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation ममता बॅनर्जींचा मास्टरस्ट्रोक: २० बंडखोर खासदारांची खासदारकी जाणार? सुप्रीम कोर्टात धाव! ३६० चा आकडा आणि दक्षिणेचा स्वाभिमान: दिल्लीच्या तख्तासमोर तामिळनाडू उभा ठाकला!